एक्स्प्लोर
पाकिस्तानी हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई सीमेत प्रवेश
रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारात पाकिस्तनाचं हेलिकॉप्टर गुलपूर सेक्टर भारतीय हवाई हद्दीत घुसलं होतं.
श्रीनगर : सीमेपलिकडून भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्ताननं आता थेट भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याच प्रयत्न केला आहे. पाकिस्तनाच्या हेलिकॉप्टरने आज भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला होता. पाकिस्तानच्या पुंछ सेक्टर परिसरात पाकिस्तानचं हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालतांना भारतीय जवानांना दिसलं आहे.
रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारात पाकिस्तनाचं हेलिकॉप्टर गुलपूर सेक्टर भारतीय हवाई हद्दीत घुसलं होतं. पाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत घुसताच भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार केला.
भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर हेलिकॉप्टरने आपला रस्ता बदलून पुन्हा पाकिस्तानात गेलं. सफेद रंगाचं हे हेलिकॉप्टर काही वेळ सीमा भागात घिरट्या घालत होतं. ज्या भागात पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरने घुसखोरी केली होती, तो भाग घुसखोरीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील मानला जातो.#WATCH A Pakistani helicopter violated Indian airspace in Poonch sector of #JammuAndKashmir pic.twitter.com/O4QHxCf7CR
— ANI (@ANI) September 30, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रीडा
बातम्या
फॅक्ट चेक
Advertisement