दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानातील माजी सैनिकांचा सहभाग, भारतात सुरक्षा व्यवस्था कडक
दहशतवादी गनिमी काव्याने आपल्या घातपाती कारवाया करीत आहेत. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करुन हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Jammu Terrorists Plan News : गेल्या काही वर्षांमध्ये जम्मूमध्ये (Jammu) दहशतवाद्यांचे (Terrorists) अचानक हल्ले वाढले आहेत. यामध्ये अनेकदा भारतीय लष्करांचे जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी गनिमी काव्याने आपल्या घातपाती कारवाया करीत आहेत. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करुन हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने तिथे अनेक ठिकाणी छावण्या स्थापन केल्या आहेत.
दहशतवादी करतायेत अमेरिकी बनावटीच्या एम-4 कार्बाइनचा वापर
जम्मू भागामध्ये गेल्या दोन वर्षात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुकाबला करताना लष्कराचे 52 जवान शहीद झाले. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करुन हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. जम्मूतील सर्व जिल्ह्यांमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी आले असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची संख्या किती हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना अद्याप कळू शकलेले नाही, असे सांगण्यात आले. कठुआ, राजौरी, पुंछ, दोडा, भद्रवाह, उधमपूर, किश्तवाड येथे गेल्या दोन वर्षांत दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानक हल्ले केले आहेत. त्यावेळी दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या एम-4 कार्बाइनचा वापर करतात.
सुंदरबनी भागात थेट नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाल
दरम्यान, राजौरी, पुंछ आणि डोडा येथील हल्ल्यांमागे जे दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. लवकरच दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करु अीशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी रात्री राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागात थेट नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाल आढळून आली आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने गोळीबार केला. गुरुवारी सकाळी सैनिकांनी परिसरात शोध घेतला असता तेथे काहीही संशयास्पद आढळले नाही. डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. जम्मूमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून जम्मूच्या सर्व जिल्ह्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने तेथे अनेक ठिकाणी छावण्या स्थापन केल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी होत आहेत. या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर यंत्रणा सतर्क झाली आहे. दहशतवाद्यांचे हल्ले परवून लावण्यासाठी अनेक ठिकाणी भारतीय जनावांनी छावण्या स्थापन केल्या आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांचे हल्ले हे पाकिस्तानच्या साथीनं होत असल्याचं समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Terrorist attack in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला; दोन चकमकीत 6 दहशतवादी ठार, 2 जवान शहीद