Video अल्लाहू अकबर म्हणणारा जिपलाईन ऑपरेटर पोलिसांच्या ताब्यात; मुज्जलिमचे वडिल स्पष्टच बोलले, म्हणाले...
हल्ल्यापूर्वी जिपलाइनसाठी जात असताना आमच्या समोर असलेली एका मागून एक कुटुंब सोडण्यात येत होती.

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Terror attack) आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून जिपलाइनचा आनंद घेणाऱ्या युवकाने थरराक प्रसंग सांगितला आहे. पहलगाममध्ये (Pahalgam) 22 एप्रिल रोजी जो हल्ला घडला, तेव्हा अहमदाबादचे ऋषी भट जे जिपलाइनचा आनंद घेत होते. विशेष म्हणजे त्यांनी जिपलाइनसाठी उड्डाण करताच खाली गोळीबार सुरू झाला होता. ते जिपलाईनचा आनंद घेत असतानाच खाली चार-पाच पर्यटकांना (Tourist) गोळ्या लागल्या होत्या. अवघ्या 7 मिनिटांच्या अंतराने ते वाचले. यावेळी, त्यांना जिपलाइनसाठी सोडणाऱ्या तरुणाने अल्ला हू अकबर... असा नारा दिला. त्यावरुन, आता वादंग सुरू असतानाच संबंधित युवकाच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली.
पहलगामच्या हल्ल्यानंतर 'ABP शी बोलताना ऋषी भट यांनी हल्ल्याचा थरार सांगितला. हल्ल्यापूर्वी जिपलाइनसाठी जात असताना आमच्या समोर असलेली एका मागून एक कुटुंब सोडण्यात येत होती. येथील एक माणूस आम्हाला जिपलाइनसाठी सोडत होता. त्याच्या मागे बसलेला एक व्यक्ती जो सगळ्यांना बेल्ट लावत होता तो उर्दूमधील पुस्तकातून काहीतरी वाचत होता. आमच्या आधी जिपलाइनवर गेलेल्या कुटुंबावेळी तो काहीही बोलत नव्हता. मात्र, आमची वेळ आली तेव्हा दुपारी 1.28 वाजता तो माणूस अल्लाहू अकबर असे तीन वेळा म्हणाला. त्याचवेळी गोळीबार सुरू झाला. त्यामुळे, कदाचित तो माणूस या सगळ्यात कुठेतरी सामील होता, असा संशय आहे. कारण, फायरींग सुरू होण्यावेळीच त्याने अल्ला हू अकबर... असा नारा दिला, असे भट यांनी सांगितले. भट यांचा जिपलाइनचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून भगवान शंकरासह माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आमच्या मागे होते, त्यामुळे आम्ही वाचू शकलो असे ऋषी भट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ऋषी भट यांनी सांगितलेल्या थरारानंतर जिपलाइनवर अल्ला हू अकबर असा नारा देणाऱ्या युवकाच्या वडिलांनी संबंधित घटनेचा खुलासा केला आहे. जिपलाइनवरील मुज्जमिल याच्या वडिलांनी एबीपी माझाशी संवाद साधला. मुज्जमिल हा तीन वर्षांपासून हे काम करत असून महिन्याला 10 हजार रुपये या कामातून कमावतो. तो इयत्ता 9 वी पर्यंत शिक्षण घेतलेला आहे.
माझा मुलगा कुठल्याही दहशतवादी कारवाईत सहभागी नाही, तो एक मजदूर आहे. इथे पोलीस किंवा एनआयएची टीम आली नसून मुजम्मिल सध्या पोलीस ठाण्यात आहे. मुज्जमिलने तीनवेळा अल्ला हू अकबर.. असा नारा का दिला, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सर्वच जण अल्ला हू अकबर म्हणतात. फायरिंगनंतर मुज्जमिलने अल्ला हू अकबर म्हटले, माहिती नाही त्याने पर्यटकास का जाऊ दिले. पण, सगळेच घाबरलेले होते, तोही घाबरला होता. घरी देखील सगळे घाबरलेले आहेत, असे मुज्जमिलचे वडिल अहमद यांनी सांगितले.
#WATCH | पहलगाम बैसरन घाटी में जिप लाइन ऑपरेटर मुज्जमिल अहमद के पिता के साथ संवाददाता @ahmadbelalji की खास बातचीत@romanaisarkhan | https://t.co/smwhXUROiK #BreakingNews #PahalgamAttack #JKPolice #India #JammuKashmir pic.twitter.com/7lYN2Cwmb3
— ABP News (@ABPNews) April 29, 2025
हेही वाचा
Video पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात; काश्मीर खोऱ्यातील 'बागलिहार धरणा'मुळे पाकचं टेन्शन वाढलं























