कशी मागाल पोलिस आणि लष्कराची मदत? काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
तुमचे जर कोणी नातेवाईक मित्र काश्मीरमध्ये अडकले असतील तर तुम्ही तेथील पोलिस आणि लष्कराची मदत मागू शकता. ही मदत तुम्हाला कशी मागता येईल याबाबतची माहिती पाहुयात.

Pahalgam Terror Attack : मंगळवारी म्हणजे 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काश्मीरला भेट देण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सर्व पर्यटक आपली सहल अर्धवट सोडून आपापल्या घरी परतत आहेत. दरम्यान, तुमचे जर कोणी नातेवाईक मित्र काश्मीरमध्ये अडकले असतील तर तुम्ही तेथील पोलिस आणि लष्कराची मदत मागू शकता. ही मदत तुम्हाला कशी मागता येईल याबाबतची माहिती पाहुयात.
अनंतनाग पोलिस नियंत्रण कक्ष हेल्पलाइन क्रमांक जारी
तुमच्या ओळखीचे कोणी किंवा नातेवाईक किंवा मित्र काश्मीरमध्ये अडकले असल्यास किंवा तुम्ही स्वतः काश्मीरमध्ये अडकले आहात. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या पोलिस आणि लष्कराची मदत तुम्ही मागू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, तर तुम्ही जम्मू-काश्मीरमधील पहल गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनंतनाग पोलिसांनी लोकांसाठी आपत्कालीन मदत क्रमांक जारी केले आहेत. जर कोणी पर्यटक तिथे अडकला असेल आणि त्याला आपत्कालीन मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळं तो अनंतनाग पोलिस नियंत्रण कक्ष हेल्पलाइन क्रमांक 9596777669, 01932225870 या क्रमांकावर कॉल करुन मदत मागू शकता. याशिवाय 9419051940 वर मेसेज पाठवून व्हॉट्सॲपद्वारे मदत मागता येईल.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमा बंद (Attari Wagah Border) करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे आणि 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. अनेक उच्च सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की भारत आता पाकिस्तानला होणारी वस्तूंची निर्यात थांबवण्याच्या तयारीत आहे. 2024 मध्ये पाकिस्तानला भारताची निर्यात 1.21 अब्ज डॉलरच्या पाच वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली होती. या हल्ल्यानंतर कॅबिनेटची महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत (एसव्हीईएस) पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना यापूर्वी जारी केलेले कोणतेही एसव्हीईएस व्हिसा रद्द समजले जातील. एसव्हीईएस व्हिसाअंतर्गत भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडावा लागेल असं सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:























