दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात जाणारा केक नेमका कशासाठी? भारतीय नागरिकांचा संताप
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भीषण हल्ला (Pahalgam Terror Attack ) केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलत राजनैतिक सवलती कमी केल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे भारतातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, राजकीय वर्तुळातही तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
पाकिस्तान दूतावासात केक नेण्यावरुन अनेक प्रकारचे अंदाज
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला आहे. ज्यामुळं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जावेळी हा कर्मचारी केक घेऊन जात होता, त्यावेळी माध्यमांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कर्मचाऱ्याने कोणताही प्रतिक्रिया दिली नाही. हा केक नेमका कोणता आनंद साजरा करण्यासाठी घेऊन जात आहेत असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. मात्र, त्याने यावर कोणतही उत्तर दिले नाही. पाकिस्तान दूतावासात केक नेण्याबाबत अनेक प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्यामुळे पाकिस्तान खूश असल्याचं बोललं जात आहे. तसेच यामागे पाकिस्तानच असल्याचे सांगितले जात आहे. सत्य काहीही असले तरी पाकिस्तानी कर्मचाऱ्याने उत्तर देण्याचे टाळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाकिस्तानी दूतावासाची सुरक्षा कमी
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांचा परिणाम दिसू लागला आहे. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानी दूतावासाबाहेर शांतता पसरली आहे. कोणताही सुरक्षारक्षक दिसत नाही. दरम्यान, या हल्ल्यानंतर कॅबिनेटची महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत (एसव्हीईएस) पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना यापूर्वी जारी केलेले कोणतेही एसव्हीईएस व्हिसा रद्द समजले जातील. एसव्हीईएस व्हिसाअंतर्गत भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडावा लागेल असं सांगण्यात आले आहे.
एका आठवड्याच्या आत भारत सोडावा लागणार
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील संरक्षण, नौदल आणि वायुसेना सल्लागारांना ‘अवांछित व्यक्ती’ घोषित करण्यात आलं आहे. त्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडावा लागणार आहे. त्याचप्रमाणे भारतही इस्लामाबादमधील आपले लष्करी सल्लागार आणि पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांना परत बोलवणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
समोर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, जीव वाचवण्यासाठी पर्यटकांनी घेतला झाडांचा सहारा, पहलगामच्या नरसंहाराचा नवीन व्हिडीओ समोर























