Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची एक बैठक अन् पाकिस्तानला हादरे, काही तासात 10 मोठे धक्के
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतानं पाच मोठे निर्णय घेत पाकिस्तानला धक्का दिला होता.

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता तर 17 जण जखमी झाले होते. भारत सरकारनं या घटनेनंतर महत्त्वाचे निर्णय घेतले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी सीसीएसची बैठक झाली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. या निर्णयानंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी झाला होता. बैसरण भागात दहशतवाद्यांनी गोळीबार करुन भारतीयांवर हल्ला केला. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पाच मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सिंध जल कराराला स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानच्या नागरिकांना 48 तासात देश सोडण्यास सांगण्यात आलं. अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. पाकच्या नागरिकांना दिलेले व्हिसा देखील रद्द करण्यात आले. भारतानं घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानला 10 मोठे धक्के बसले आहेत.
पाकला बसलेले 10 धक्के
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर झाला. पाकिस्तानचं शेअर मार्केट क्रॅश झालं. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर केएसई-100 निर्देशांक 1024 अंकांनी घसरून 117,226 अंकांवर आला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानच्या जीडीपीचा विकास दराचा अंदाज घटवला आहे. तो 3 टक्क्यांवरुन 2.6 टक्क्यांवर आणला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर फिच रेटिंग्जनं देखील पाकिस्तानच्या चलनासंदर्भात इशारा दिला आहे. पाकिस्तानचा रुपया जूनपर्यंत एका डॉलरसाठी 285 रुपयांपर्यंत घसरेल, असा अंदाज व्यक्त केला.
सिंधू जल करार स्थगित करण्यात आल्यानं पाकिस्तानच्या शेती उत्पादनावर आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होईल. काही राज्यांमध्ये वीज संकट निर्माण होऊ शकतं.
अटारी चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं पाकिस्तानचं जवळपास 3 हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं. पाकिस्तानकडून सोयाबीन, भाज्या, लाल मिर्चीसह इतर गोष्टींची भारतात निर्यात होत व्हायची ती बंद होणार आहे.
जागतिक बँकेंन पाकिस्तानला इशारा देत चालू आर्थिक वर्षात 1 कोटी पाकिस्तानी नागरिकांच्या खाद्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, असा अंदाज वर्तवला. देशात गरिबी वाढेल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
भारतानं पाकिस्तानी नागरिकांना दिलेला सार्क व्हिसा तातडीनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं यापुढे पाकिस्तानी नागरिकांना भारतात येता येणार नाही.
जे पाकिस्तानी लोक भारतात असतील त्यांना 48 तासांमध्ये देश सोडून जावं लागणार आहे. त्यामुळं जोपर्यंत तणाव कमी होत नाही तोपर्यंत ते पुन्हा भारतातयेऊ शकणार नाहीत.
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ती संख्या 55 वरुन 30 वर आणली गेली आहे. पाकिस्तानी संरक्षण सल्लागारांना देश सोडण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आला आहे.
भारतानं पाकिस्तानंवर डिजिटल स्ट्राइक केला असून पाकिस्तान सरकारचं X खातं भारतात बॅन करण्यात आलं आहे.
























