एक्स्प्लोर

अमित शाहांचा MIM च्या असदुद्दीन ओवैसींना फोन; पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, हा कट रचणाऱ्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार असल्याचेही मोदींनी ठणकावले आहे.

नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधील पहलगाम दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीसीएस म्हणजेच कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर, आज बिहार दौऱ्यावर असलेल्या मोदींनी थेट येथील सभेला संबोधित करताना पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. उनकी बची-कुची जमिन को अब मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है... अशा शब्दात मोदींनी भारत गप्प बसणार नसल्याचे म्हटले. दुसरीकडे याच अनुषंगाने केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisee) यांना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी फोन करुन दिल्लीला बोलावलं. 

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, हा कट रचणाऱ्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार असल्याचेही मोदींनी ठणकावले आहे. तसेच, उनकी बची-कुची जमिन को अब मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है.. असेही मोदींनी म्हटले. दरम्यान, केंद्र सरकारने आज महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली असून राजकीय पक्षांच्या प्रमुखांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जात असून सरकारकडून गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत ब्रीफ करणार आहेत. 

गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह या मुद्द्यावरुन विविध पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. त्याच अनुषंगाने अमित शाह यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना स्वत: फोन करुन दिल्लीत बैठकीला येण्याचे आवाहन केले आहे. खासदार ओवैसी यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून पहलगाम हल्ला हा महत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मला फोन करुन विचारलं, तुम्ही कुठं आहात, लगेच दिल्लीला या, असे ओवैसी यांनी सांगितले. तसेच, मी आता तिकीट बुक केलं असून तातडीने दिल्लीला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. 

दरम्यान, मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठकीसाठी अगोदर एमआयएमला बोलवले नव्हते, त्यानंतर ओवैसींनी केंद्रीयमंत्री किरण रिजीजू यांना फोनवरुन संपर्क साधला. तसेच, मोदींनी या बैठकीसाठी मलाही निंमत्रण द्यावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर, आता अमित शाह यांनी फोन करुन या बैठकीचं निमंत्रण असदुद्दीन ओवैसींना दिलं आहे. 

सीसीएस बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानविरोधात 5 तकडे निर्णय घेण्यात आले. 

पाकिस्तानविरुद्ध 5 तगडे निर्णय

सिंधु पाणी करार स्थगित 
पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद 
पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश 
अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार 
भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद  

हेही वाचा

ह्रदयद्रावक... 7 वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरुन आईच्या हातातून सुटलं; चिमुकल्याने मृत्युने हळहळ

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
Chandrashekhar Bawankule : नागपुरातील भीषण स्फोट निष्काळजीपणामुळेच; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 82 लाखांची मदत, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
नागपुरातील भीषण स्फोट निष्काळजीपणामुळेच, केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 82 लाखांची मदत, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
Embed widget