Padma Awards 2024 : वैंकय्या नायडू आणि चिरंजीवी यांना पद्मविभूषण जाहीर, तर संगीतकार प्यारेलाल, मिथून चक्रवर्ती यांना पद्मभूषण, एकूण 132 जणांचा गौरव
Padma Awards 2024 Winners : एकूण पाच जणांचा पद्मविभूषण तर 17 जणांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2024 Winners) घोषणा झाली असून त्यामध्ये माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू (Venkaiah Naidu) आणि साऊथचा सुपरस्टार चिरंजिवी (Chiranjeevi) यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर संगीतकार प्यारेलाल आणि अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. एकूण पाच जणांचा पद्मविभूषण तर 17 जणांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण
- वैंकया नायडू
- चिरंजिवी
- वैजंयतीमाला बाली
- ब्रिंदेश्वर पाठक (मरणोत्तर)
- पद्मा सुब्रमण्यम
पद्मभूषण (महाराष्ट्रातील मानकरी)
- हुरमुसजी कामा
- अश्विन मेहता
- राम नाईक
- दत्तात्रय मायायो उर्फ राजदत्त
- प्यारेलाल शर्मा
- कुंदन व्यास
पद्मश्री (महाराष्ट्रातील मानकरी)
- उदय देशपांडे
- मनोहर डोळे
- झहिर काझी
- चंद्रशेखर मेश्राम
- कल्पना मोरपारिया
- शंकरबाबा पापलकर
या 132 जणांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे, चक 8 जण परदेशी, एनआयआर, पीआयओ, ओसीआय या प्रवर्गातील आहेत. तसेच 9 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
For the year 2024, the President has approved the conferment of 132 #PadmaAwards including 2 duo cases (in a duo case, the Award is counted as one) as per list below.
— Press Trust of India (@PTI_News) January 25, 2024
The list comprises 5 #PadmaVibhushan, 17 #PadmaBhushan and 110 #PadmaShri Awards.
30 of the awardees are… pic.twitter.com/JkaMynze7k
उदय देशपांडेंना पद्मश्री पुरस्कार
मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत 50 देशातील 5 हजारहून अधिक लोकांना मल्लाखांबाचं प्रशिक्षण दिलं आहे.
देशातील सर्वोच्च नागरी सन्मान
देशात पद्म पुरस्कारांची सुरूवात 1954 साली करण्यात आली. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा /कार्यक्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. 'पद्मविभूषण' हा पुरस्कार उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवेसाठी दिला जातो. उच्च श्रेणीतील अतुलनीय सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय सेवेसाठी ‘पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
ही बातमी वाचा: