एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यूपीएससी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठीची दिल्लीत लगबग सुरु, लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकमेव स्पेशल ट्रेन
ही ट्रेन दिल्ली ते पुणे व्हाया भुसावळ, नाशिक, कल्याण अशी धावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सोयीचं होणार आहे. यूपीएससीची परीक्षा आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे 31 मे रोजी होणार होती.
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी धावणारी एकमेव स्पेशल ट्रेनची तयारी आता पूर्ण झालीय. महाराष्ट्र सरकारच या विद्यार्थ्यांचा प्रवासाचा खर्च उचलणार असल्याचं स्पष्ट झालंय. दिल्लीतल्या राजेंद्रनगर परिसरा त जवळपास 1400 विद्यार्थ्यांना घेऊन ही ट्रेन 16 मे रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या स्पेशल ट्रेनच्या प्रवासासाठीची लगबग सुरु झाली असून जवळपास 50 दिवस अडकलेले विद्यार्थी आता घरी जाणार या भावनेनं सुखावले आहेत. या विद्यार्थ्यांना शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनकडून मास्क, हँडग्लोव्हज, पाणी बॉटल आणि एकवेळचं जेवण पुरवलं जाणार आहे.
आधी या ट्रेनसाठी दिल्ली-भुसावळ या मार्गाला परवानगी मिळाली होती. पण आता ही ट्रेन दिल्ली ते पुणे व्हाया भुसावळ, नाशिक, कल्याण अशी धावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सोयीचं होणार आहे. यूपीएससीची परीक्षा आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे 31 मे रोजी होणार होती. त्यामुळे 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही हे विद्यार्थी दिल्लीतच तयारीसाठी थांबले होते. त्यातल्या अनेकांचं परीक्षा केंद्रही दिल्लीच होतं. पण नंतर परीक्षेचं भवितव्य अधांतरी असल्यानं आणि लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याचेही हाल होत असल्यानं त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे याबाबत गाऱ्हाणं मांडलं होतं.
दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेन, चार स्टॉपची परवानगी
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, काँग्रेसकडून खासदार राजीव सातव, युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या स्पेशल ट्रेनसाठी पाठपुरावा केला होता. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे परराज्यांत अडकलेल्या मराठी लोकांसाठी स्पेशल ट्रेन सोडण्याची मागणी केली होती.
कोटामध्ये आयआयटी जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपाठोपाठ आता या विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्र सरकार राज्यात परत आणणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत घरमालकांनी घरभाड्यात कुठलीच सूट दिली नसल्यानंही या विद्यार्थ्यांचे अधिक हाल होत होते.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement