Lockdown | दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत : सत्यजीत तांबे
राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता दिल्लीत असलेल्या यूपीएससी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे प्रयत्न करत आहेत.
मुंबई : राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर, देशाच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. कोटामधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पुढाकार घेतलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आता दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असल्याचं सत्यजीत तांबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.
"यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत असलेले आणि ज्यांना महाराष्ट्रात परत यायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्या संपर्कात आम्ही आहोत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्तांशी चर्चा केली असून या ऑपरेशनचं समन्वय करण्याची सूचना दिली आहे," असं ट्वीट सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.
We are in touch with all UPSC aspirants who are currently in Delhi and wants to come back to Maharashtra. Our Disaster Mgmt Minister @VijayWadettiwar Ji has spoken to Resident Comm. Of Maharashtra and instructed him to co-ordinate this operation.
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 27, 2020
कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एसटी धावणार
कोटामध्ये अडकलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी लवकरचं स्वगृही
कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसटीने महाराष्ट्रात आणणार? राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून महाराष्ट्रात आणणार असल्याचं समजतं. या विद्यार्थ्यांना आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन केलं जाणार आहे. सरकारने कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याबाबत घोषणा केली होती. मात्र त्यांना आणणार कसं? याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता महाराष्ट्राची लालपरी या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धावणार असल्याचं कळतं. राज्याने विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबत राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला पत्राद्वारे कळवलं आहे. राजस्थानमधून निघून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून प्रवास करुन महाराष्ट्रात येणार आहे. राज्यात परतल्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना 14 दिवस क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे.