एक्स्प्लोर

Onam 2022 : दक्षिण भारतात 'ओनम'चा उत्साह, काय आहे 'या' उत्सवाची खासियत

Happy Onam 2022 : दक्षिण भारतातील महत्त्वाचा सण म्हणज ओनम. बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक आख्यायिका आहे.

Happy Onam 2022 : ओनम (Onam) हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक आख्यायिका सांगितली जाते. ओनम हा मल्याळी बांधवांचा मोठा सण आहे. ओनम हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. यामधील शेवटचा दहावा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवसाला 'थिरुवोणम' (Thiruvonam) असं म्हणतात. यंदा ओनमचा हा सण आज 8 सप्टेंबरला साजरा केला जातं आहे. 'थिरुवोणम' शब्द 'थिरु' आणि 'ओनम' दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे. यामध्ये 'थिरु' शब्दाचा अर्थ पवित्र असा आहे. दुसऱ्या एक अख्यायिकेनुसार, या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराचा जन्म झाला होता. 

'थिरुवोणम' नंतरही दोन दिवस ओनम सण साजरा केला जातो. मात्र आधीचे 10 दिवस अधिक महत्त्वाचे असतात. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील महत्वाचा दिवस म्हणजे ओनम. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते. केरळमध्ये ओनम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

ओनम सणाचं महत्त्व

ओनम मल्याळम कॅलेंडरमधील चिंगम महिन्यामध्ये येणार सण आहे. मल्याळम बांधव वर्षातील महिला महिना ओनम सणाद्वारे साजरा करतात. दहा दिवस चालणाऱ्या या सणानिमित्त घराची साफसफाई करून सजावट केली जाते. या दिवशी केरळमध्ये नौका शर्यतीचंही खास आकर्षण असतं. याशिवाय बैलांच्या शर्यतीही आयोजित केल्या जातात. ओनम हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या काळात पीक कापणीचा हंगाम सुरु असतो. शेतकरी पिकाची पूजा करतात.

बळीराजा प्रजेच्या भेटीला येतो

बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजा आपल्या पराक्रमाबद्दल, न्यायीपणाबद्दल आणि प्रजेवरील प्रेमाबद्दल प्रसिद्ध होता. त्यामुळे बळीराजाच्या आगमनाचा उत्सव हा ओनमच्या स्वरुपात साजरा केला जातो. आजच्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात, घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि त्यावर रांगोळी काढली जाते. ओनमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखला जातो. पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं. या दिवशी दान करण्यालाही महत्त्व दिलं जातं.

बळीराजाला वरदान

विष्णूने वामन अवतार धारण करुन बळीराजाला पाताळात ढकलले. बळीराजाने वचनपूर्तीसाठी आपले प्राणही दिले. बळीराजाच्या या त्यागावर खुश होऊन विष्णूने त्याला वरदान मागण्यास सांगितले. त्यावर बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ओनमच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असं समजलं जातं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget