एक्स्प्लोर

7 october In History : शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांचे निधन आणि मदर टेरेसा यांच्या संस्थेला मान्यता, आज इतिहासात 

On This Day In History : देशातील दंगलविरोधी पथक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शीघ्र कृती दलाची (Rapid Action Force) स्थापना 7 ऑक्टोबर 1992 रोजी करण्यात आली. 

मुंबई: ऑक्टोबर महिन्यातील 7 तारीख ही जगाच्या आणि भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी इतिहासात शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांचं नांदेडमध्ये निधन झालं होतं. तसेच आजच्याच दिवशी म्हणजे, 7 ऑक्टोबर 1950 रोजी मदर टेरेसा यांच्या मिशनरी ऑफ चॅरिटी या संस्थेच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली. पुढे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांची सेवा केली. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं. 

1586- मुघल सैन्याचा काश्मीरवर कब्जा

मुघल सैन्याने आजच्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर 1586 रोजी काश्मीरमध्ये प्रवेश केला. चक वंशाचा राजा युसुफ शाह याने मुघलांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे अकबराच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने काश्मीरवर कब्जा मिळवला. 

1708- शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांचे नांदेंडमध्ये निधन 

शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांचे 7 ऑक्टोबर रोजी नांदेड (Nanded) या ठिकाणी निधन झालं. शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले होते. श्री गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षे शत्रूविरुद्ध सामना केला. 1708 मध्ये त्यांनी नांदेड येथील सचखंड परिसरात आपला देह ठेवला. त्याच परिसरात सचखंड गुरुद्वारा आहे. 

श्री गुरु गोविंद सिंग दररोज गुरुवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना आणि अनुयायांना त्याचा सविस्तर अर्थ सांगत असत. धर्म आणि समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करुन समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावण्याचे महत्वपूर्ण काम श्री गुरु गोविंद सिंग यांनी केले.

1914- ठुमरी आणि गझल गायिका बेगम अख्तर यांचा जन्मदिन 

ठुमरी आणि गझल गायिका बेगम अख्तर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1914 रोजी उत्तर प्रदेशातील भदरसा या ठिकाणी झाला. गझल या गायिकेमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं. त्यामुळे त्यांना 'मल्लिका ए गझल' असं म्हटलं जायचं. 

1931- आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणाऱ्या डेसमंड टूटू यांचा जन्मदिन 

आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधात लढा उभा करणाऱ्या डेसमंड टूटू (Desmond Tutu) यांचा 7 ऑक्टोबर 1931 रोजी जन्म झाला. डेसमंड टूटू हे एक आंग्ल आर्चबिशप होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा पुकारला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

1950- मदर टेरेसा यांना 'मिशनरी ऑफ चॅरिटी'ची स्थापना करण्यास मंजुरी 

देशातील रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करण्यासाठी मदर टेरेसा (Mother Teresa) यांनी आपले जीवन समर्पित केलं. त्यांनी भारतात आपल्या कार्याची सुरुवात केली. मदर टेरेसा यांना 7 ऑक्टोबर 1950 रोजी मिशनरी ऑफ चॅरिटी या (Missionaries of Charity) संस्थेची स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली. मदर टेरेसा यांनी ही संस्था कोलकात्यात स्थापन केली आणि आपल्या समाजकार्याला सुरुवात केली. आज त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून देशभरात शेकडो अनाथालयं आणि रुग्णालयं कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. मदर टेरेसा यांच्या या कार्याची दखल घेऊन 1979 साली त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तर 1980 साली त्यांना भारतरत्न देण्यात आला. 

1989- मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिचा जन्मदिन 

भारतीय मॉडेल, अभिनेत्री आणि मिस वर्ल्डचा खिताब पटकवणाऱ्या युक्ता मुखी हिचा जन्म 7 ऑक्टोबर 1989 रोजी झाला. मिस वर्ल्ड हा पुरस्कार पटकवणारी युक्ता मुखी ही चौथी भारतीय महिला ठरली होती. 

1992- रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना 

आजच्या दिवशी, 7 ऑक्टोबर 1992 रोजी भारतात शीघ्र कृती दल म्हणजे रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना करण्यात आली. देशातील अंतर्गत सुरक्षा ठेवण्यासाठी केंद्र सरकारने या अर्धसैन्य दलाची स्थापना केली होती. देशभरात कुठेही दंगल होवो किंवा गर्दीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर या कामात रॅपिड अॅक्शन फोर्स अग्रेसर असतं. 

2001- अमेरिकेचा अफगाणिस्तावर हल्ला 

दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या (US) ट्विन टॉवरवर 26 नोव्हेंबर रोजी हल्ला करुन या जुळ्या बिल्डिंग जमीनदोस्त केली. त्यानंतर अमेरिकेने जागतिक दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं.नाटोच्या सैन्यानेही अमेरिकेच्या या भूमिकेला मान्यता दिली. या हल्ल्याचा सूत्रधार असलेला ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने 7 ऑक्टोबर 2001 रोजी अफगाणिस्तानवर (Afghanistan)पहिला हवाई हल्ला केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget