एक्स्प्लोर

Omicron in India : तिसर्‍या लाटेचा कहर? ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या चार हजारांवर, पाहा तुमच्या राज्यातील परिस्थिती

Omicron in India : आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, नवीन आकडेवारीसह, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 झाली आहे. तर, ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा 4,000 पार पोहोचला आहे.

Omicron in India : भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग वेगाने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या 4033 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 1552 लोक या आजारातून बरे झाले आहेत. या आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 1216 ओमायक्रॉन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्याचवेळी, राजस्थानमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रुग्णांची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 529 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, दिल्लीतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 513 झाली आहे. ओमायक्रॉन संसर्गाच्या बाबतीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्णसंख्या चार हजारांवर

महाराष्ट्रात 1216 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 529 रुग्ण आढळले आहेत. तर, दिल्लीतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 513 झाली आहे. याशिवाय कर्नाटकात 441, केरळमध्ये 333, गुजरातमध्ये 236, तामिळनाडूमध्ये 185, हरियाणामध्ये 123 आणि उत्तर प्रदेशमध्ये 100 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 729 नवे रुग्ण

एकीकडे ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. यातच देशातील कोरोनाबाधितांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 79 हजार 729 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 146 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आतापर्यंत  3 कोटी 57 लाख 7 हजार 727 जणांना कोरोनाची लागण
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, नवीन आकडेवारीसह, देशातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या आता 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 झाली आहे. तर, या महामारीमुळे आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 4 लाख 83 हजार 936 वर गेली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणानंतर आता सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 23 हजार 619 झाली आहे. मात्र, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 172 लोक कोरोना महामारीतून बरे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

व्हिडीओ

Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
Rahul Gandhi : प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
Embed widget