Ola Electric Scooter : ओलाचा धमाका! केवळ 499 रुपयात बुक करा ओलाची ई-स्कूटर
Ola Electric Scooter : ओलाच्या ई-स्कुटरचे लॉन्चिंगच्या आधीच बुकिंग सुरु आहे. आपणही ओलाची ही ई-स्कूटर केवळ 499 रुपयात बुक करु शकता.
![Ola Electric Scooter : ओलाचा धमाका! केवळ 499 रुपयात बुक करा ओलाची ई-स्कूटर Ola electric scooter bookings open You can now reserve the Ola e scooter by paying Rs 499 Ola Electric Scooter : ओलाचा धमाका! केवळ 499 रुपयात बुक करा ओलाची ई-स्कूटर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/16/7863e9b90b5715fa39fcfd22f6822d13_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ola Electric Scooter : ओलाची ई-स्कूटर लवकरच बाजारात येणार असून लॉन्चिंगपूर्वीच त्याचे बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. ओलाच्या olaelectric.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन केवळ 499 रुपयांत ई-स्कूटर बुक करण्याची संधी कंपनीने दिली आहे. कंपनीच्या वतीनं एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करुन ही माहिती देण्यात आली आहे.
ओला कंपनीचे चेअरमन आणि सीईओ भाविश अगरवाल यांनी सांगितलं की, भारतात आता इलेक्ट्रिक व्हेईकल रिव्होल्यूशनला सुरुवात झाली आहे कारण आम्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगला सुरुवात केली आहे.
India’s EV revolution begins today! Bookings now open for the Ola Scooter!
— Bhavish Aggarwal (@bhash) July 15, 2021
India has the potential to become the world leader in EVs and we’re proud to lead this charge! #JoinTheRevolution at https://t.co/lzUzbWtgJH @olaelectric pic.twitter.com/A2kpu7Liw4
आपल्या या ई-स्कूटरची किंमत किती असेल याची घोषणा कंपनीने अद्याप केली नाही. पण ही किंमत सामान्यांच्या आवाक्यातील असेल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. जे लोक आता बुकिंग करतील त्यांना विक्रीमध्ये प्राधान्य देणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. एक व्यक्ती कितीही गाड्या बुक करु शकतो. आणि आपले बुकिंग कॅन्सल करायचे असेल तर कोणत्याही क्षणी तसे करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असं केल्यास बुकिंगचे 499 रुपये परत मिळतील असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
ओलाने तामिळनाडू राज्यात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी स्थापन केली आहे. त्यासाठी कंपनीकडून 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी ओलाने तामिळनाडू राज्य सरकारसोबत एक करार केला आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रातील भारताची आयात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या गुंतवणुकीमुळे स्थानिक उत्पादनांना वाव मिळणार आहे आणि हजारो नव्या नोकऱ्या निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra SSC Result 2021: आज दहावीचा निकाल, पाहा महत्वाचे अपडेट्स
- Surekha Sikri Passes Away : तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रख्यात अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन
- रद्द झालेल्या IT Act 66 A नुसार नोंद केलेले सर्व गुन्हे मागे घ्या; सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)