एक्स्प्लोर
सरकारचा नवा निर्णय, 'बिग बाझार'मधूनही पैसे काढता येणार
मुंबई: नोटबंदीनंतर एटीएम आणि बँकासमोरील गर्दी अजूनही कमी होत नाही. त्यामुळे सरकारनं आता यावर आणखी एक उपाय शोधून काढला आहे. आता तुम्हाला बिग बाझारमधूनही डेबिट कार्ड स्वाईप करुन दोन हजारांची रक्कम काढता येणार आहे.
बिग बाझार समूहाचे अध्यक्ष किशोर बियाणी यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. त्यामुळे बँका आणि एटीएम बाहेरील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवार पासून बिग बाझारच्या सर्व शाखांमध्ये डेबिट कार्डच्या मदतीनं लोकांना दोन हजार रुपये मिळू शकतील.
दरम्यान, बिग बाझारमध्ये दोन हजार काढण्यासाठी कोणता सरचार्ज लागणार आहे का? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याआधी एटीएम बाहेरील गर्दी कमी होण्यासाठी सरकारनं पेट्रोल पंपवर देखील दोन हजार रुपये काढण्याची सोय केली होती. आता याबरोबरच बिग बाझारमध्येही सुविधा सुरु करण्यात आली आहे. संबंधित बातम्या: पेट्रोल पंपावरही पैसे काढता येणार, रांगा कमी करण्यासाठी नवा उपाय!Now one can withdraw 2000rs from bigbazaar using your debit card from this Thursday onwards pic.twitter.com/UH3BjLZbra
— Kishore Biyani (@kishore_biyani) November 22, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement