एक्स्प्लोर
Advertisement
'आधार'मुळे मोबाईल फोन बंद होणार नाहीत : UIDAI
यामुळे मोबाईल फोन वापरणाऱ्या देशभरातील 50 कोटी युझरचे फोन बंद होऊ शकतात, असं वृत्त प्रसारित झालं होतं.
नवी दिल्ली : आधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही, असं आश्वासन टेलीकॉम विभाग आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिलं आहे. टेलीकॉम विभाग आणि आधारने याबाबत आज (18 ऑक्टोबर) संयुक्त निवेदन जारी केलं आहे.
आधार क्रमांक व्हेरिफेकेशनच्या आधारावर जारी केलेले सिम कार्ड जर नव्या व्हेरिफिकेशनमध्ये फेल ठरले, तर हे सिम कार्ड डिसकनेक्ट केले जाऊ शकतात. यामुळे मोबाईल फोन वापरणाऱ्या देशभरातील 50 कोटी युझरचे फोन बंद होऊ शकतात, असं वृत्त प्रसारित झालं होतं. मात्र हे वृत्त काल्पनिक आणि चुकीचं असल्याचं यूआयडीएआय, आधार प्राधिकरणाने म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, "खासगी कंपन्या व्हेरिफिकेशनसाठी आधार क्रमांकाचा वापर करु शकत नाहीत. फोन कनेक्शन किंवा बँक खाती आता आधारशी लिंक करणं गरजेचं नाही. खासगी कंपन्या युझरकडून याची मागणीही करु शकत नाहीत." या मुद्द्यावर सरकारमध्ये उच्च स्तरावर विचारविनिमय सुरु आहे. कारण जर मोठ्या संख्येने मोबाईल नंबर डिसकनेक्ट केले तर नागरिकांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सरकार नव्या केवायसीसाठी युझरना आवश्यक वेळ देईल.
आधार प्रकरणात सुनावणी करताना आदेश दिला होता की, मोबाईल कंपन्या युझरच्या ओळखीसाठी आधार क्रमांकाचा वापर करु शकत नाही. परंतु 50 कोटींपेक्षा जास्त मोबाईल नंबर आधार क्रमांकावरच सुरु होते. आधार क्रमांक हटल्यानंतर आणि त्याऐवजी दुसरं वैध जमा न केल्यास मोबाईल नंबर बंद होऊ शकतो.
"सरकारला याची काळजी असून उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. आधार हटवून त्याऐवजी नवं ओळखपत्र जमा करेपर्यंत मोबाईल युझरला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कमीत कमी अडचणींसह हे प्रकरण कसं निकाली काढता येईल, याचा सरकार विचार करत आहे," असं टेलीकॉम सचिव अरुणा सुंदरराजन म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement