शिक्षक भरती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील इंटरनेट आणि SMS सेवा बंद, राजस्थानचा निर्णय
Rajasthan : शिक्षक भरतीची परीक्षा विना अडथळा पार पडावी यासाठी राजस्थान सरकारने पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद ठेवली आहे.
![शिक्षक भरती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील इंटरनेट आणि SMS सेवा बंद, राजस्थानचा निर्णय No Internet And sms Service In Rajasthan's 5 Districts Today To Stop Cheating In REET Exam शिक्षक भरती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाच जिल्ह्यातील इंटरनेट आणि SMS सेवा बंद, राजस्थानचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/21/9709f2bb3c690bb8290c5717d11f8286_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जयपूर : आपल्या देशातील विविध परीक्षांच्या पेपर फुटीच्या आणि गैरप्रकाराच्या घटना काही नवीन नाहीत. त्यात आता इंटरनेटमुळे असे फुटलेले पेपर्स एका क्षणात व्हायरल होतात. तसेच परीक्षांच्या ठिकाणी इंटरनेटचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केले जातात. पण परीक्षेतील कॉपीसारखे आणि पेपर फुटीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी राजस्थान सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. शिक्षक भरतीची परीक्षा विना अडथळा पार पडावी यासाठी राजस्थान सरकारने पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद ठेवली आहे.
राजस्थान इलिजिबिलिटी एक्झामिनेशन फॉर टीचर्स म्हणजे REET ही परीक्षा राज्यातील सर्वात महत्वाची परीक्षा मानली जाते. राजस्थानात सरकारी शाळांतील 31 हजार शिक्षक भरतीसाठी आज REET परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती सुरु असल्याने याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. या परीक्षेतील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी राजस्थान सरकारने पाच संवेदनशील जिल्ह्यातील इंटरनेट आणि मोबाईल एसएमएस सुविधा 12 तासांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमधील अजमेर, अल्वार, जयपूर,दौसा आणि झुंझुनू या पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा आणि मोबाईल एसएमएस सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमध्ये सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा करायची असेल तर राजस्थान इलिजिबिलिटी एक्झामिनेशन फॉर टीचर्स म्हणजे REET ही परीक्षा पास होणं बंधनकारक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
- INDW Vs AUSW : शेवटच्या 'नो बॉल'मुळे भारताची हार, अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
- Drugs Case: ड्रग्स केसमध्ये अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ अटकेत, Arjun Rampal म्हणाला...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)