Nirmala Sitharaman : भाजपमुळे भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, आत्ताचा भारत UPA च्या पोकळ आश्वासनांना बळी पडणार नाही; निर्मला सीतारामण
Lok Sabha : मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजप सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावरून लोकसभेत विरोधकांवर निशाणा साधला
Nirmala Sitharaman In Lok Sabha : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत (Lok Sabha) अविश्वास प्रस्तावाच्या (No Confidence Motion) विरोधात बोलताना म्हणाल्या की, भाजप सरकारने भारताला नाजूक अर्थव्यवस्थेतून सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत बदललं आहे. मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावरून विरोधकांनी भाजप सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. यावर सध्या संसदेत चर्चा सुरु आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं की, आता भारत पोकळ आश्वासनांना बळी पडत नाही.
'तुम्ही जनतेना स्वप्नं दाखवली, आम्ही सत्यात उतरवली'
निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत विरोधकांवर निशाणा साधतं म्हटलं की, "भारत पोकळ आश्वासनांच्या युगात जगत नाही. परिवर्तन हे शब्दांतून नव्हे तर प्रत्यक्षात होतं. तुम्ही लोकांना स्वप्नं दाखवलीत. आम्ही त्यांची स्वप्नं सत्यात उतरवली. आमचा सर्वांना सशक्त बनण्यावर विश्वास आहे." निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अविश्वास ठरावाच्या चर्चेदरम्यान हे वक्तव्य केलं आहे.
#WATCH | No Confidence Motion discussion | Union FM Nirmala Sitharaman says, "Words like 'banega, milega' are not in use anymore. What are the people using these days? 'Ban gaye, mil gaye, aa gaye'. During UPA, people said 'Bijli aayegi', now people say 'Bijli aa gayi'. They said… pic.twitter.com/SLVPqbBOlL
— ANI (@ANI) August 10, 2023
'बनेगा, मिलेगा' नाही 'बन गया, मिल गया'
निर्मला सीतारामन यांनी पुढे म्हटलं की, "बनेगा, मिलेगा' सारखे शब्द आता वापरात नाहीत. आजकाल लोक कोणते शब्द वापरत आहेत? तर 'बन गये, मिल गए, आ गये'. यूपीएच्या काळात लोक 'बिजली आएगी' म्हणायचे, आता लोक म्हणतात 'बिजली आ गयी'. आधी ते म्हणायचे 'गॅस कनेक्शन मिलेगा', आता ते 'गॅस कनेक्शन मिल गया'... असं म्हणतात विमानतळ 'बनेगा' असं नाही तर विमानतळ 'बन गया' असं म्हणतात". असं म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
'भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था'
सीतारामण यांनी म्हटलं की, भारत आता कमकुवत अर्थव्यवस्थेतून वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थेत बदलला आहे. उच्च चलनवाढ आणि कमी विकास दर या दुहेरी आव्हानांशी जागतिक अर्थव्यवस्था झगडत आहे. गेल्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था केवळ 3 टक्के वाढ झाली. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, आता 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 2.1 टक्क्यांपर्यंत घसरेल.
#WATCH | Union FM Nirmala Sitharaman says, "We have realised that the banking sector needs to be healthy and therefore we took a lot of measures. Banks are able to work without political interference, they are working with professional integrity. 'Banks mein failaya hua aapka… pic.twitter.com/H2ktvKp1ot
— ANI (@ANI) August 10, 2023
'अवघ्या 9 वर्षांत, भारताची अर्थव्यवस्था सुधारली'
युरोझोन, चीन आणि इतर राष्ट्रांमधील कठीण काळातील उदाहरणे देत सीतारामण म्हणाल्या की, "2013 मध्ये मॉर्गन स्टॅन्लेने भारताचा समावेश जगातील पाच कमकुवत अर्थव्यवस्थांच्या यादीत केला होता. आज त्याच मॉर्गन स्टॅन्लेने भारताचा दर्जा सुधारला आणि त्याला रेटिंगमध्ये उच्च स्थान दिलं आहे. अवघ्या 9 वर्षांत, भारताची अर्थव्यवस्था सुधारली आणि आमच्या (भाजप) सरकारच्या धोरणांमुळे कोविडकाळातही आर्थिक विकास झाला. आज आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत."