एक्स्प्लोर

Bihar Election | नितीश कुमार यांचा 16 नोव्हेंबरला शपथविधी? मंत्रिमंडळावर अद्याप निर्णय नाही

पंतप्रधानांनी नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास केला जाईल असे वक्तव्य केले आणि नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. ते सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. परंतु नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देताना महत्वाची खाती भाजप आपल्या पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएला कौल दिल्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल हे अजून ठरलेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत एनडीएने 125 जागा जिंकल्या आहेत. परंतु नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाच्या विजयी उमेदवारांच्या संख्येत मोठी घट झाली असून त्यांचे केवळ 43 आमदार विजयी झाले आहेत.

पंतप्रधानांनी संभ्रम दूर केला एनडीएमध्ये सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आपलाच व्हावा अशी मागणी सुरु केली होती. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत भाजपने नितीश कुमारांना दिलेला शब्द आता ते पाळतील का अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. काल बुधवारी झालेल्या दिल्लीतील भाजपच्या विजयी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतची शंका दूर केली. त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली सत्ता बनेल हे स्पष्ट केले. परंतु नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देताना महत्वाची आणि जास्तीची खाती भाजप आपल्या पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याच्या मार्गावर असणारे नितीश कुमार सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. गेल्या सरकारचा कार्यकाल आता समाप्त झाला असल्याने ते आपला राजीनामा राज्यपालांना सोपवतील. आता पुन्हा एकदा नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या दोन दशकात सात वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट होणार आहे. नितीश कुमारांनी सर्वप्रथम 2000 साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी बहुमतासाठी अपेक्षित संख्याबळ त्यांना जमवता आले नसल्याने राजीनामा द्यावा लागला होता.

नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ नितीश कुमार सर्वप्रथम 3 मार्च 2000 साली आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. दुसऱ्यांदा 24 नोव्हेंबर 2005 साली ते बिहारचे मुख्यमंत्री बनले. 26 नोव्हेंबर 2010 साली त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चौथ्यांदा त्यांनी 22 फेब्रुवारी 2015 साली मुख्यमंत्रीपद मिळवले. 20 नोव्हेंबर 2015 साली पाचव्यांदा पुन्हा एकदा त्यांनी शपथ घेतली. सहाव्या वेळी 27 जुलै 2017 साली ते परत एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Dhammachakra Pravartan Din 2024 : दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maybach Car Kolhapur  : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझाSanjay Shirsat Mumbai : 'आता शुभ बोलं रे नार्या' असं बोलण्याची वेळ आलेली आहे - संजय शिरसाटSujay Vikhe Patil Bhagwangad : दसरा मेळावा राजकीय व्यासपीठ नाही; मुंडे साहेबांनी  सुरू केलेली परंपराSanjay Raut Full PC : डुप्लिकेट लोकंही दसरा मेळावा करतात -संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Dhammachakra Pravartan Din 2024 : दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Embed widget