एक्स्प्लोर
वर्षभरात साडेचार लाख अपघात, दीड लाख मृत्यू, महाराष्ट्राचा तिसरा नंबर
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी 2016 मधील रस्ते अपघाताचा अहवाल सादर केला.
नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी 2016 मधील रस्ते अपघाताचा अहवाल सादर केला.
गेल्या वर्षी तब्बल 4 लाख 80 हजार 652 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 1 लाख 50 हजार 785 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गडकरींनी दिली. सध्याचं अपघाताचं प्रमाण हे ताशी 55 इतकं आहे. म्हणजेच प्रत्येक तासाला देशभरात 55 अपघात होतात, तर तासाला 17 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो.
सर्वाधिक रस्ते अपघातात उत्तर प्रदेश पहिल्या, तामिळनाडू दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या नंबर आहे. तर भारतात सर्वाधिक अपघात होणाऱ्या शहरात राजधानी दिल्ली अव्वल स्थानावर आहे.
असं असलं तरी 2015 च्या तुलनेत रस्ते अपघातांची संख्या 4.1 टक्क्यांनी घटली आहे, मात्र अपघातातील मृतांचं प्रमाण 3.2 टक्क्यांनी वाढलं आहे.
दुसरीकडे 52 हजार 500 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यापैकी 10 हजार 135 जणांचा मृत्यू हा हेल्मेट न घातल्याने झाल्याचं गडकरी म्हणाले.
तर 2138 जणांचा मृत्यू हा ड्रायव्हिंग करत असताना मोबाईलवर बोलत असल्याने झाला आहे.
2016 मधील अपघात आणि मृत्यू
- अपघात : 4 लाख 80 हजार 652
- अपघाती मृत्यू: 1 लाख 50 हजार 785
- तासाला 55 अपघात
- तासाला 17 जणांचा अपघाती मृत्यू
- 52 हजार 500 दुचाकी स्वारांचा अपघाती मृत्यू
- त्यापैकी 10 हजार 135 जणांचा मृत्यू विनाहेल्मेटमुळे
- 2138 जणांचा मृत्यू मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग केल्यामुळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement