Corona Vaccine : एकाच व्यक्तीला दोन वेगळे डोस देणं सध्या तरी अशक्य, निती आयोगाचं स्पष्टीकरण
एका व्यक्तीला कोविशिल्डचा एक आणि कोवॅक्सिनचा एक असे वेगवेगळे दोन डोस दिल्याने रिअॅक्शन येण्याची शक्यता आहे असं निती आयोगानं (NITI Aayog) सांगितलं आहे.

नवी दिल्ली : एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस द्यावेत हे प्रोटोकॉलला धरुन नसून सध्या तरी ते अशक्य आहे असं निती आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतात जे लसीकरण होतंय ते नियमांनुसार आणि दोन डोसचे वेळापत्रक पाळूनच होईल असंही निती आयोगानं सांगितलं आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी ही माहिती दिली. लस तुटवडा असताना, अनेक नागरिकांना दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत असताना अशा प्रकारे दोन वेगवेगळे डोस देण्याची शक्यता पुढे आली होती. पण सध्या तरी हे शक्य नाही असं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय.
निती आयोगाचे (आरोग्य) सचिव डॉ.व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, भारतात सुरु असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये कोणताही बदल होणार नाही. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे 12 आठवडे तर कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते सहा आठवडेच राहणार आहे.
#WATCH | No change in the schedule of Covishield doses; it will be two doses only. After the first Covishield dose is administered, second dose will be given after 12 weeks. Covaxin also has two doses' schedule, second dose to be administered in 4-6 weeks: Dr. VK Paul, NITI Aayog pic.twitter.com/Y575jws6u7
— ANI (@ANI) June 1, 2021
डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, "एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळे डोस दिल्यास त्यामुळे संबंधित व्यक्तीला रिअॅक्शन येण्याची शक्यता आहे. काही प्रकरणात असं लक्षात आलंय की दोन वेगवेगळे डोस घेतल्यानं संबंधितामध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठी वाढ झालीय. पण सध्यातरी अशा प्रकारे एकाच व्यक्तीला दोन वेगळ्या लसींचे डोस देण्यात येणार नाही."
देशात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाच्या कार्यक्रमात अडचणी येत आहेत. त्यात पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीला त्याच लसीच्या दुसऱ्या डोससाठी ताटकळत रहायला लागत असल्याचं चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून एकाच व्यक्तीला दुसऱ्या डोसच्या रुपात उपलब्ध कोणतीही लस देण्यात यावी अशी मागणी पुढं येत होती.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus : कोरोनामुक्त झाल्यानंतर 2 ते 6 आठवडे काळजी घेणं गरजेचं; लहान मुलांमध्ये पुन्हा आढळतायत काही लक्षणं
- विनातिकीट प्रवास करुन तिकीट निरीक्षकाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
- सरकारी नोकरी, पुरेसं अन्न फक्त आश्वासनांपुरतंच; राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफवर लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
