Nirmala Sitharaman : कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील तरुणीचा मृत्यू, निर्मला सीतारमण म्हणाल्या, काहीही असो तुमच्यात प्रेशर सहन करण्याची ताकद हवी
Nirmala Sitharaman : पुण्यातील एका सीए असलेल्या तरुणीने कामाच्या तणावामुळे आयुष्य संपवलं होतं, यावर निर्मला सितारमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये स्ट्रेस आणि व्यवस्थापनाचा विषय अभ्यासला जावा असं मत व्यक्त केलं आहे. सीतारमन म्हणाल्या, अभ्यासक्रमात हा विषयाचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांना मानसिकरित्या मजबूत होण्यास मदत होईल. एका कंपनीत काम करणाऱ्या युवतीने(सीए) कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या केली. याबाबत निर्मला सीतारमन यांनी नाव न घेता मत व्यक्त केलं आहे. दरम्यान निर्मला सीतारमन यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. निर्मला सितारमन यांचं वक्तव्य 'पुर्णत: क्रूरतेचं' असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
अॅना सेबॅस्टियन पेरिल या 2023 मध्ये CA परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर सुमारे चार महिने त्यांनी पुण्यातील कंपनीत काम केलं. मात्र, जुलैमध्ये कामाच्या अतिताणामुळे त्यांनी आयुष्याचा शेवट केला. त्यांनंतर पेरिल यांच्या आईने EY India चे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहून म्हटले होते की, नवीन कर्मचारी म्हणून तिला कामाचा जास्त भार देण्यात आला होता. ज्याचा तिच्यावर 'शारीरिक, भावनिक आणि मानसिक' परिणाम झाला. त्यानंतर फर्ममधील कामकाजाती आणि वातावरणाची चौकशी करणार असल्याचे सांगून सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केलाय.
एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना सीतारामन यांनी महिला सीएचा उल्लेख केला. मात्र, कामगार आणि काम करत असलेल्या कंपनीचे नाव सांगितले नाही. सीतारामन म्हणाल्या, ''गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असलेल्या एका मुद्द्यावर चर्चा करत होते.
आमची मुलं महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिक्षणासाठी जातात आणि तिथून उत्कृष्टतेने बाहेर पडतात. सीएचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीला कंपनीत कामाचा ताण सहन करता येत नव्हता. दबाव सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी दोन-तीन दिवसांपूर्वी आम्हाला मिळाली होती.
शैक्षणिक संस्था आणि कुटुंबांनी मुलांना तणाव व्यवस्थापनाच्या युक्त्या शिकवल्या पाहिजेत आणि त्यांना सांगावे की, तुम्ही कोणताही अभ्यास करा, कोणतीही नोकरी करा, त्यासोबतचा ताण सहन करण्याची आंतरिक शक्ती तुमच्यात असली पाहिजे.
काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या टिप्पणीवरून सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'सत्ताधारी पक्ष आणि अर्थमंत्री यांनाच अदानी, अंबानींसारख्या कॉर्पोरेट दिग्गजांचे दुखणे दिसते. कष्टकरी तरुण पिढीची नाही. या ऐतिहासिक बेरोजगारीच्या युगात अण्णासारख्या प्रतिभावंतांना नोकरी मिळवून देण्यात यश आले तरी लोभी कॉर्पोरेट कंपन्यांकडून त्यांचे शोषण होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांनी पश्चिम महाराष्ट्रात शड्डू ठोकला; कोल्हापुरातील मेळाव्याला नेत्यांची फौज अवतरली; 'त्या' 10 जणांसोबत चर्चा करणार!