एक्स्प्लोर
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीला निवडणूक लढवण्याची परवानगी

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्यायला उत्तर प्रदेश येथील निवडणूक लढवण्यास परवानगी मिळाली आहे. विशेष एनआयए न्यायालयाने गुरूवारी ही परवानगी दिली. याआधीही 2012 मध्ये उत्तर प्रदेश येथे झालेली निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयानं उपाध्यायला परवानगी दिली होती. त्यावेळी आखिल भारत हिंदू महासभा पक्षाकडून त्याने दोन मतदार संघातून निवडणूक अर्ज भरला होता. दोन्ही ठिकाणी तो पराभूत झाला.
यावर्षी होणारी निवडणूक लढवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज उपाध्यायने न्यायालयात केला होता. या अर्जाचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने एनआयएनला दिले होते. या अर्जाला विरोध नाही, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने उपाध्यायला निवडणूक लढवण्यास परवागनी दिली.
निवडणुकीच्या प्रचारासाठी 4 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत तात्पूरता जामीन मंजूर करावा, अशी विनंती करणारा अर्जही उपाध्यायने न्यायालयात केला. त्या अर्जावर येत्या सोमवारी एनआयए न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
