एक्स्प्लोर
125 कोटी भारतीयांची ताकद असलेला नवभारत निर्माण होत आहे : मोदी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नवभारत' निर्माण होत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याचाच अर्थ विकास होत आहे, असंही मोदी म्हणाले.
https://twitter.com/narendramodi/status/840817686825336832
नवभारताच्या निर्माणाचा संकल्प धरा, प्रतिज्ञा घ्या आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपवर आपली बांधिलकी व्यक्त करा, असं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलं आहे.
https://twitter.com/narendramodi/status/840817179037716480
पंतप्रधानांनी ट्वीट करत 'एक नवीन भारत निर्माण होत आहे. त्याच्याकडे सव्वाशे कोटी भारतीयांची ताकद आणि क्षमता आहे. या भारताचा अर्थ विकास असा होतो' असं मोदी म्हणाले.
2022 मध्ये भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करेल. गांधीजी, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल, असा भारत आपण त्यावेळी तयार केलेला हवा, अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/narendramodi/status/840817907823202305
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 325 जागा जिंकत अभूतपूर्व यश मिळवलं आहे. मोदीलाटेपुढे सपा-काँग्रेस आघाडी आणि बसप पूर्णतः निष्प्रभ ठरल्याचं चित्र आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपने 70 पैकी 56 जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसला अवघ्या 11 जागा जिंकता आल्या.
संबंधित बातम्या :
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement