एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, जेईईचंही वेळापत्रक जाहीर
परीक्षा वर्षातून दोनदा आणि ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मोठा यू टर्न घेतला आहे. सात जुलैला पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे केलेली घोषणा मागे घेण्याची वेळ मनुष्यबळ विकास मंत्रालयावर आली आहे.
![नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, जेईईचंही वेळापत्रक जाहीर neet exam will be conduct only once in a year no online test says HRD ministry नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, जेईईचंही वेळापत्रक जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25081212/neet-exam.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहे. परीक्षा वर्षातून दोनदा आणि ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मोठा यू टर्न घेतला आहे.
सात जुलैला पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे केलेली घोषणा मागे घेण्याची वेळ मनुष्यबळ विकास मंत्रालयावर आली आहे. नीटची परीक्षा ऑनलाईन नव्हे, तर पेन, पेन्सिलद्वारेच होणार असल्याचंही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
यंदा नीटची परीक्षा 5 मे रोजी होईल, तर निकाल 5 जून रोजी लागणार आहे.
दरम्यान, जेईई परीक्षा मात्र घोषणा केल्याप्रमाणे वर्षातून दोन वेळा होणार आहे. शिवाय ही परीक्षा ऑनलाईन होईल. जेईईची पहिली मुख्य परीक्षा पुढच्या वर्षी 6-20 जानेवारी आणि निकाल 31 जानेवारी रोजी जाहीर होईल. तर जेईईची दुसरी मुख्य परीक्षा 6 ते 20 एप्रिलला होणार असून निकाल 30 एप्रिल रोजी जाहीर होईल.
![नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, जेईईचंही वेळापत्रक जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/21185034/jee.jpg)
![नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, जेईईचंही वेळापत्रक जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/21185057/cmat.jpg)
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion