एक्स्प्लोर
हरभरा दाळ 60 रुपये प्रति किलो दराने
नवी दिल्लीः ग्राहकांना दाळ 60 रुपये प्रति किलो विकावी, असे निर्देश राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ म्हणजेच एनसीसीएफला केंद्र सरकारने दिले आहेत. दाळींच्या वाढत्या किंमतीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
एनसीसीएफ अगोदरपासूनच मदर डेअरी आणि केंद्रीय भांडार यांच्यासोबत मिळून तूर आणि उडीद दाळ 120 रुपये प्रति किलो दराने विकत आहे.
तूर दाळ आणि उडीद दाळीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यानंतर दिल्लीमध्ये हरभरा दाळीचेही दर गगनाला भिडले आहेत. त्यानंतर सरकारने उपाय म्हणून हाचचाली करण्यास सुरुवात केली आहे.
दाळींच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवता यावं यासाठी एनसीसीएफला स्वस्त दरात दाळ विकण्याचे निर्देश दिले आहेत, असं केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रीलयाने एका पत्रकाद्वारे म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement