एक्स्प्लोर
फ्रान्स बनावटीच्या स्कॉर्पिन पाणबुडीची गोपनीय माहिती लीक, संरक्षणमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
नवी दिल्ली : भारतीय नौदलात लवकरच रुजू होणाऱ्या फ्रान्स बनावटीच्या स्कॉर्पिन पाणबुडीबद्दलची हजारो कोटींची गोपनीय माहिती लीक झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियातील मीडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गोपनीय माहिती तब्बल 22 हजार 400 पानांची असून ती उघड झाल्याने संरक्षणदलात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नौदलाला चौकशीचे आदेश दिले आहेत.
फ्रान्स बनावटीची स्कॉर्पिन पाणबुडी
भारतीय नौदलात रुजू होणारी स्कॉर्पिन पाणबुडी ही फ्रान्स बनवावटीची आहे. ही पाणबुडी कशी आहे, तिचा वापर कसा होतो, त्याचे फिचर्स काय आहेत? ही आणि अशी सर्व माहिती लीक झाली आहे. या पाणबुडीचं ऑपरेटिंग मॅन्यूअल लीक झाल्याने, ही माहिती कोणाकडून आणि कशी लीक झाली याची आता चौकशी होणार आहे.
"भारताच्या स्कॉर्पिन पाणबुडीची माहिती लीक झाली आहे का याच्या चौकशीचे आदेश नौदलाला देण्यात आले आहेत. तसंच या लीक झालेल्या माहितीचा भारताशी काही संबंध आहे का? हे तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जर काही माहिती लीक झाली असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल." अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
ऑस्ट्रेलियन बनावटीच्या स्कॉर्पिन पाणबुड्या या अत्याधुनिक असून फार संथ आणि शांतपणे पाण्याखाली राहू शकतात. त्यामुळे त्यांचा वावर शत्रूच्या लक्षात येत नाही. पण ही अतिशय गोपनीय माहिती उघड झाल्याने भारतीय नौदलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement