एक्स्प्लोर
गोव्यातील दाबोळी विमानतळावर लढाऊ विमान कोसळलं!
‘मिग-29 के’ कोसळल्यानंतर काही काळ दाबोळी विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.
पणजी : नौदलाच्या दाबोळी विमानतळावर आज दुपारी ‘मिग-29 के’ लढाऊ विमान कोसळून अपघात झाला. कोसळताच विमानाने पेट घेतला. मात्र प्रसंगावधान राखून पायलट सुखरुपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
‘मिग-29 के’ कोसळल्यानंतर काही काळ दाबोळी विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. सुरक्षात्मक उपाय योजल्यानंतर धावपट्टी पुन्हा खुली करण्यात आली.
‘मिग-29 के’ विमान कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या अपघातामुळे दाबोळी विमानतळावरुन उड्डाण करणारी काही विमाने उशिराने सोडण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement