National War Memorial Anniversary : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन, जाणून घ्या इतिहास
देश आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत आहे.
National War Memorial Anniversary : देश आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी आज राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिली. यादरम्यान संरक्षण सचिव अजय कुमार यांनीही राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यानंतरच्या शूर सैनिकांच्या बलिदानाची साक्ष म्हणून राष्ट्रीय युद्ध स्मारक 25 फेब्रुवारी 2019 रोजी देशाला समर्पित करण्यात आले.
राष्ट्रीय युद्ध स्मारकाबद्दल जाणून घ्या
पंतप्रधान मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले होते. 1947-48 च्या युद्धापासून ते गलवान खोऱ्यातील चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षापर्यंत या युद्धस्मारकात शहीद झालेल्या सैनिकांची नावेही कोरलेली आहेत. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये प्राण गमावलेल्या सैनिकांची नावेही या स्मारकात कोरलेली आहेत.
राष्ट्रीय युद्ध स्मारक हे 40 एकरांवर पसरलेलं आहे. या युद्ध स्मारकामध्ये स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या 26 हजारांहून अधिक भारतीय सैनिकांचं नाव कोरलेलं आहे. येथे एक राष्ट्रीय युद्ध संग्रहालयही आहे.
नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये सर्व भारतीय संरक्षण कर्मचार्यांची नावे आहेत. ज्यांनी 1947-48 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धापासून ते गलवान खोऱ्यातील चिनी सैन्याशी झालेल्या संघर्षापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये आपले प्राण गमावले. दहशतवादविरोधी लढाईमध्ये प्राण गमावलेल्या जवानांची नावेही स्मारकाच्या भिंतींवर लावण्यात आली आहेत.
नॅशनल वॉर मेमोरिअलमध्ये देशासाठी शहीद झालेल्या 26000 सैनिकांची नावे लिहिण्यात आली आहेत. यांनी युद्ध आणि वेगवेगळ्या कारवायांमध्ये देशासाठी आपला जीव गमावला होता, या स्मारकाचा काही भाग अंडरग्रांऊड आहे. परमवीर चक्र मिळालेल्या शहिदांची नावे हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिण्यात आली आहेत. "हे स्मारक तयार करण्यासाठी जवळपास 176 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
या स्मारकातील प्रतिमा आणि परिसर हिरवागार ठेवण्यासाठी इथे 14 लाख लिटरची एक अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीम तयार केली आहे.
इथल्या भींतींवर ग्रेनाइटच्या दगडांवर शहिदांची नावे, रॅंक आणि रेजिमेंटचा उल्लेख आहे. यात भारतीय लष्करातील 25,539, नौसेनेच्या 239 आणि वायूसेनेच्या 164 शहिदांची नावे आहेत.
"तसेच इथे परमवीर चक्र मिळालेल्या 21 जवानांच्या कास्यांच्या प्रतिमा आहेत.
मुलांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची भावना जागृत करणे या उपक्रमाचा उद्देश
आज, राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त, CBSE ने शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकार यांच्याशी सल्लामसलत करून शाळेच्या बँडचा एक विशेष कार्यक्रम तयार केला आहे. या अंतर्गत शाळेचे बँड रोटेशन पद्धतीने राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आपली कला सादर करतील. संरक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये शालेय बँडचे कला प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची भावना जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे जेणेकरून त्यांना या प्रतिष्ठित युद्ध स्मारकाशी संबंधित विविध पैलूंचा अनुभव घेता येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Crisis : युक्रेनवरील हल्ल्यानंतर ब्रिटनने रशियावर लादले नवे निर्बंध, रशियन बँका लंडनच्या आर्थिक व्यवस्थेबाहेर
- Russia Ukraine War : रशियन फौजांचा चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा; जगाच्या चिंतेत भर
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असा होईल परिणाम; जाणून घ्या प्रमुख मुद्दे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha