एक्स्प्लोर

Russia Ukraine War : रशियन फौजांचा चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा; जगाच्या चिंतेत भर

Russia Ukraine War Chernobyl : रशियन फौजांनी चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा मिळवला आहे. या मुले

Russia Ukraine War : रशियन फौजांनी गुरुवारी चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा मिळवला आहे. वर्ष 1986 मध्ये या अणू ऊर्जा प्रकल्पात मोठा स्फोट झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग पसरला होता. त्यामुळे या परिसरातील जनजीवन उद्धवस्त झाले होते. सध्या या अणू ऊर्जा प्रकल्पाची जागा अणू प्रकल्पातील टाकाऊ वस्तूंचे केंद्र आहे. त्याशिवाय या ठिकाणी अनेक टन अणू इंधनाचा साठादेखील आहे. चेर्नोबिल अणू प्रकल्प रशियन फौजांच्या ताब्यात गेल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी  (Volodymyr Zelenskyy)यांनी याआधीच रशियन सैन्य चेर्नोबिल अणू प्रकल्पाचा ताबा घेऊ शकतात अशी शंका व्यक्त केली होती. आमचे सैनिक प्राणांची पर्वा न करता या भागाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतील असेही झेलेन्सकी यांनी युद्धापूर्वी म्हटले होते. 

चेर्नोबिल अणू प्रकल्प हा युक्रेनची राजधानी कीवपासून 130 किमी अंतरावर आहे.  एप्रिल 1986 मध्ये मोठा स्फोट झाला होता. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, चेर्नोबिल अणू प्रकल्पात यावेळी युक्रेन आणि रशियातील अणू प्रकल्पाचा 22 हजार गोणी अणू कचरा ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी पुन्हा एखादा मोठा अपघात होऊ शकतो. या ठिकाणी स्फोट झाला तरी मोठं संकट येऊ शकतं अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. या ठिकाणाहून होणारा किरणोत्सर्ग फैलावू शकतो आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्सकी यांचे सल्लागार मिखाइल पोदोलियाक यांनी सांगितले की, युरोपमध्ये पूर्ण युद्ध सुरू झाले आहे. रशियाने केवळ युक्रेनवरच हल्ला केला नाही, तर आधुनिक जगाच्या सामान्य जीवनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या युद्धामुळे युक्रेनमधील लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवले जाऊ शकते अशीही भीती व्यक्त केली जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget