National Safety Day 2022 : राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास, थीम आणि महत्त्व जाणून घ्या...
National Safety Day 2022 : अपघात टाळण्यासाठी अवलंबल्या जाणार्या संरक्षणात्मक उपायांबद्दल जनजागृती करणे हा या दिनाचा उद्देश आहे.
National Safety Day 2022 : भारतामध्ये 4 मार्च रोजी नॅशनल सेफ्टी कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे राष्ट्रीय सुरक्षा दिन (National Safety Day) साजरा केला जातो. हा दिवस लोकांना आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या आणि लोक त्यांच्या जीवनात भेडसावत असलेल्या इतर समस्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी साजरा केला जातो. तसेच, अपघात टाळण्यासाठी अवलंबल्या जाणार्या संरक्षणात्मक उपायांबद्दल जनजागृती करणे हा या दिनाचा उद्देश आहे. आज 51 व्या राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त या दिनाचा इतिहास नेमका काय ते जाणून घ्या.
राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा उद्देश संरक्षणात्मक मार्गदर्शक तत्त्वांबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. 1972 मध्ये प्रथमच राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे आयोजन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या स्थापना दिनी करण्यात आले होते. सुरक्षा आणि कार्यसंस्कृतीचे एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी कर्मचारी आणि सामान्य लोकांच्या वचनांमध्ये नाविन्य आणणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास (National Safety Day History) :
फेब्रुवारी 1966 मध्ये, श्रमविषयक स्थायी समितीच्या 24 व्या अधिवेशनात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा ठराव मंजूर करण्यात आला. 4 मार्च 1966 रोजी, भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा परिषद एक युनिट म्हणून स्थापन केली. सोसायटी नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत कौन्सिलची नोंदणी करण्यात आली. शिवाय, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट, 1950 अन्वयेही परिषदेची नोंदणी करण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा दिन मोहीम एका दशकानंतर 4 मार्च 1972 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषद स्थापना दिन साजरा करण्यासाठी सुरू झाली.
राष्ट्रीय सुरक्षा दिनाची थीम (National Safety Day Theme) :
यावर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिनाची थीम 'तरुण मनांचे पालनपोषण करा सुरक्षा संस्कृती विकसित करा. अशी आहे.
राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे महत्त्व (National Safety Day Importance) :
सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे, विशेषत: रस्ता सुरक्षा, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, पर्यावरणाचे संरक्षण आणि मानवी आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दिन महत्त्वाचा आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha