एक्स्प्लोर

National Herald Case : ED ची मोठी कारवाई, नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा

National Herald Case : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्डच्या (National Herald) कार्यालयावर छापा टाकला आहे.

National Herald Case : अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्डच्या (National Herald) कार्यालयावर छापा टाकला आहे. ईडीचे (ED) अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून शोध मोहीम सुरु आहे. या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत.

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ईडीने दिल्लीतील नॅशनल हेराल्ड हाऊसवर छापा टाकला. दस्तऐवजांच्या शोधात नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर ईडीने छापे मारले. या दरम्यान 10 जनपथवर झालेल्या दस्तऐवजांचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या ठिकाणांवर छापेमारी होऊ शकते. ईडी सध्या नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनच्या ऑफिस हेराल्ड हाऊसमध्ये छापा मारला जात आहे.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरु केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.

दरम्यान याप्रकरणी ईडीनं यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी काँग्रेसनं ईडीच्या कारवाईचा निषेध करत राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशव्यापी निदर्शनं केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचं पहिल्या वनडेत नेमकं काय चुकलं? पराभव 'या' कारणामुळं 
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचा  पहिल्या वनडेत पराभव 'या' कारणामुळं, जाणून घ्या 
Credit Score :  कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Fraud: निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा 1 नोव्हेंबरला एल्गार
Voter List Row: 'विरोधकांची केविलवाणी धडपड, फक्त मिमिक्री करतायत', Pravin Darekar यांची टीका
Voter List Row: मतदार यादीत घोळ? लोकशाही प्रक्रियेला धोका असल्याचा गंभीर आरोप
Pravin Darekar : राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर, वाद पेटला
Raj Thackeray : 'निवडणुका मॅच फिक्सिंग, निकाल आधीच ठरलाय', राज ठाकरेंचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचं पहिल्या वनडेत नेमकं काय चुकलं? पराभव 'या' कारणामुळं 
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचा  पहिल्या वनडेत पराभव 'या' कारणामुळं, जाणून घ्या 
Credit Score :  कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, सुधीर मुनगंटीवारांची टीका
राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, सुधीर मुनगंटीवारांची टीका
Raju Shetti on Murlidhar Mohol: मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी; राजू शेट्टींचा पलटवार
मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी; राजू शेट्टींचा पलटवार
Share Market : तीन दिवसात सेन्सेक्सवर 1900 अंकांची तेजी, निफ्टी मजबूत, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिलासा
तीन दिवसात सेन्सेक्सवर 1900 अंकांची तेजी, निफ्टी मजबूत, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिलासा
Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चाला यावं, जयंत पाटील यांचं आवाहन
निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरुद्ध लढा, संजय राऊतांकडून मोर्चाची घोषणा, विरोधक पुन्हा एकत्र येणार
Embed widget