एक्स्प्लोर
न्यायासाठी पैलवान नरसिंग यादवच्या आई-वडिलांचं उपोषण
मुंबई : नरसिंग यादवविरोधात कट रचला आहे. त्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं नरसिंगच्या आई-वडिलांनी सांगितलं. डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यामुळे कुस्तीपटू नरसिंग यादवची आलिम्पिकवारी हुकली आहे. त्याच्याऐवजी 23 वर्षीय प्रवीण राणाला रिओ ऑलिम्पिकसाठी संधी मिळाली आहे.
रिओ ऑलिम्पिकच्या तोंडावर भारतीय क्रीडा जगतात डोपिंगच्या डागामुळे खळबळ उडाली. कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. त्यानंतर त्याचा रुममेटही डोपिंग चाचणीत दोषी ठरला. यानंतर त्याच्या जेवणात उत्तेजक पदार्थ मिसळल्याची बाब समोर आली.
या पार्श्वभूमीवर नरसिंगच्या आई-वडिलांनी उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. आपल्या मुलावर अन्याय झाला आहे. त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान वाराणसीजवळ असलेल्या खरदहा या मूळगावातील गावकऱ्यांनी निषेध मोर्चा काढून नरसिंगला न्याय मिळावा अशी मागणी केली.
संबंधित बातम्या
रिओ ऑलिम्पिकसाठी नरसिंगऐवजी प्रवीण राणाला संधी
नरसिंग कटाचा बळी, न्यायासाठी लढणारः WFI
कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
नरसिंग यादवच्या जेवणात औषध मिसळणारा सापडला : महासंघ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement