एक्स्प्लोर

सिनेमात नाचणारीसाठी माझं तिकीट कापलं : नरेश अग्रवाल

''माझं राज्यसभेचं तिकीट हे सिनेमात नाचणारीसाठी कापण्यात आलं,'' असं ते म्हणाले. समाजवादी पार्टीने यावेळी उत्तर प्रदेशमधून पुन्हा एकदा जया बच्चन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नरेश अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश करताच आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ''माझं राज्यसभेचं तिकीट हे सिनेमात नाचणारीसाठी कापण्यात आलं,'' असं ते म्हणाले. समाजवादी पार्टीने यावेळी उत्तर प्रदेशमधून पुन्हा एकदा जया बच्चन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावेळी व्यासपीठावर असलेल्या भाजप नेत्यांना नरेश अग्रवाल यांच्या वक्तव्याच्या गांभीर्यतेचा अंदाज आला. व्यासपीठावरील भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी अग्रवाल यांच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सिनेमात असो किंवा वास्तविक जीवनात, भाजप पक्ष सर्व सदस्यांचा सन्मानच करतो, असं पात्रा म्हणाले. राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या नरेश अग्रवाल यांनी समाजवादी पार्टीला रामराम करत भाजपात प्रवेश केला. जोपर्यंत राष्ट्रीय पक्षात जाणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय समस्या सुटणार नाहीत, असं ते म्हणाले. ''मुलायम सिंग यादव आणि रामगोपाल यांची साथ कधीच सोडणार नाही. मी त्यांच्यासोबत आहे. सिनेमात डान्स करणारीसाठी माझं तिकीट कापण्यात आलं. माझा मुलगा आमदार आहे आणि तो राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे आभार,'' असं वक्तव्य नरेश अग्रवाल यांनी केलं. यावर्षी समाजवादी पक्षाचे सहा खासदार किरणमय नंदा, दर्शन सिंह यादव, नरेश अग्रवाल, जया बच्चन, मुनव्वर सलीम आणि आलोक तिवारी निवृत्त होत आहेत. उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टी यावेळी केवळ एकाच उमेदवाराला राज्यसभेवर पाठवू शकते. जया बच्चन यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला आहे. नरेश अग्रवाल उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून आहेत. समाजवादी पक्षात येण्यापूर्वी ते मायावती यांच्या बसपामध्ये होते. नरेश अग्रवाल यांना तडजोडीच्या राजकारणात मास्टर मानलं जातं. नरेश अग्रवाल यांचा पक्ष बदलाचा प्रवास नरेश अग्रवाल यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात 1980 साली काँग्रेसमधून केली. त्यानंतर त्यांचा पक्ष बदलण्याचा आणि ज्यांची सत्ता असेल त्यांच्या पक्षात जाण्याचा इतिहास आहे. काँग्रेस सोडल्यानंतर लोकतांत्रिक काँग्रेसची स्थापना केली आणि भाजपच्या कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह सरकारमध्ये ते मंत्री झाले होते. नरेश अग्रवाल 2002 साली मुलायम सिंग यादव यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि सपाची सत्ता जाताच बसपामध्ये प्रवेश केला. 2007 साली सपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली, मात्र बसपाची सत्ता येताच ते बसपामध्ये सहभागी झाले. 2012 साली सपाचं अखिलेश यादव सरकार येताच ते पुन्हा सपामध्ये आले आणि राज्यसभेवर गेले. आता 2017 मध्ये सपाचं सरकार गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपशी जवळीक साधत भाजपात प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या

Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
Sonia Gandhi : 'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Vishwajeet Kadam and Satej Patil: स्टेजवर भाषणं सुरु असताना बंटी पाटलांच्या मनात वेगळीच तगमग, सतत मोबाईलकडे नजर, विश्वजित कदमांनी अस्वस्थता ओळखली, म्हणाले...
स्टेजवर भाषणं सुरु असताना बंटी पाटलांच्या मनात वेगळीच तगमग, सतत मोबाईलकडे नजर, विश्वजित कदमांनी अस्वस्थता ओळखली, म्हणाले...
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Embed widget