एक्स्प्लोर

पहिल्या तीन टप्प्यात मोदींच्या 83 सभा, राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर; दुसऱ्या क्रमांकावर कोण?

प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत.

नवी दिल्ली : देशातील निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवट दिवस आहे. त्यामुळे, सर्वच दिग्गज नेतेमंडळी प्रचारासाठी उमेदवारांच्या मतदारसंघात (Loksabha Election) तळ ठोकून आहे. महाराष्ट्रात 4 थ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान (Voting) होत असून देशभरातील विविध राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यामुळे, देशपातळीवरील नेतेही प्रचारसभांचे दौरे कर आहेत. पहिल्या तीन टप्प्यातील प्रचारसभांची आकडेवारी पाहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सर्वाधिक सभा घेऊन रेकॉर्ड केला आहे. पहिल्या 3 टप्प्यात मोदींनी तब्बल 83 सभा घेतल्या आहेत. त्यामुळे, प्रचारसभांच्या रणधुमाळीत मोदींचा पहिला नंबर लागतो.  

प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमित शाह यांनी 66 सभा आणि रोड शो केले आहेत. या काळात पंतप्रधान मोदींनी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 83 निवडणूक सभा आणि 'रोड शो'मध्ये भाग घेतला आहे, याबाबत भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, मोदींच्या तुलनेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 40 निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले, तर प्रियांका गांधी यांनी 29 प्रचार सभांमधून जनतेला संबोधित केले आहे.

14 मे रोजी मोदींचा उमेदवारी अर्ज

31 मार्च ते 5 मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. 83 निवडणूक सभा घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना खूप मागे टाकले आहे. दरम्यान, 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी १३ मे रोजी त्यांच्या विशाल 'रोड शो'चे आयोजन करण्यात आले आहे.  

शिंदे-पवार वाराणसीला जाणार 

सर्व नेते वाराणसीत येणार मोदी यांच्या उमेदवारीसाठी 25 ते 30 समर्थकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध जाती, जमातींचे लोक आहेत. यांना समर्थक बनवून मोदी हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नसून त्यांना सर्व जाती-धर्माचा पाठिंबा मिळत आहे, असा संदेश दिला जाणार आहे.पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते वाराणसीला पोहोचणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही वाराणसीला जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक प्रचारसभा, 'रोड शो' करणारे नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी 83
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 66
काँग्रेस नेते राहुल गांधी 40
प्रियांका गांधी 29

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Embed widget