Narendra Modi On Donald Trump Tarrif: अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला; नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव न घेता प्रत्युत्तर, म्हणाले, आमच्यासाठी...
Narendra Modi On Donald Trump Tarrif: डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपली धमकी खरी करून दाखवली आहे. भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली.

Narendra Modi On Donald Trump Tarrif: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर आपली धमकी खरी करून दाखवली आहे. भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर (Donald Trump Tarrif On India) लादण्याच्या कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ही करवाढ 21 दिवसांनंतर म्हणजेच 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलंय. 25 टक्के अतिरिक्त करामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयातकर 50 टक्के झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नाव घेता प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे, या ध्येयांवर आम्ही सतत काम करत आहोत, असं नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात म्हणाले.
India will never compromise on the interests of its farmers. pic.twitter.com/WExdyvkLRU
— PMO India (@PMOIndia) August 7, 2025
भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर-
भारत सरकारने रशियाचंच उदाहरण देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं होतं. ज्या रशियाचं नाव घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावलं आहे, त्याच रशियाकडून अमेरिका व युरोपियन युनियन कच्चा माल आयात करत असल्याचा दाखला भारतानं दिला आहे.युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्रे रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भारतावर सातत्याने टीका करत आहेत. पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे उपलब्ध पुरवठा पर्याय हे युरोपकडे वळवण्यात आले. त्यामुळेच भारतानं रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली, असं भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अमेरिकेचा भारतावर सर्वाधिक कर, कोणत्या देशावर किती टॅरिफ?
अफगाणिस्तान -15%
अल्जेरिया - 30%
अंगोला -15%
बांगलादेश - 20%
बोलिव्हिया - 15%
बोस्निया आणि हर्जेगोविना -30%
बोस्निया आणि हर्जेगोविना - 15%
बोत्स्वाना - 15%
ब्राझील - 10%
ब्रुनेई - 25%
कंबोडिया -19%
कॅमेरून - 15%
इक्वेडोर 15%
इक्वेटोरियल गिनी 15%
घाना - 15%
गयाना 15%
आइसलँड 15%
भारत 50%
इंडोनेशिया 19%
इराक 35%
इस्राएल 15%
जपान 15%
जॉर्डन 15%
कझाकस्तान - 25%
लाओस 40%
लेसोथो 15%
लिबिया 30%
लिक्टेंस्टाइन - 15%
मादागास्कर - 15%
मलावी 15%
मलेशिया 19%
म्यानमार 40%
नामिबिया 15%
नौरू 15%
न्यूझीलंड 15%
निकाराग्वा 18%
नायजेरिया 15%
पाकिस्तान 19%
दक्षिण आफ्रिका - 30%
दक्षिण कोरिया - 15%
श्रीलंका - 20%
स्वित्झर्लंड - 39%
सीरिया 41%
तैवान 20%
थायलंड 19%
तुर्की 15%
व्हिएतनाम - 20%
झिम्बाब्वे - 15%
























