Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प भडकले, भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ, रशियाकडून तेल खरेदीमुळं निर्णय
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं हा निर्णय घेतलाय.

Trump put extra tariff on India वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादणार असल्याचं म्हटलंहोतं. त्यामुळं अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफची टक्केवारी आता 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं चिडलेल्या ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.
भारतावर आता अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ संदर्भातील कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय पक्षपाती स्वरुपाचा निर्णय आहे, असं म्हटलं. ट्रम्प यांचा एकतर्फी व्यवहार प्रतिबिंबीत होतं. भारताच्या रशियाच्या व्यापारावर ट्रम्प यांचा आक्षेप आहे तर यूरोपियन यूनियनचा रशियासोबत भारतापेक्षा अतिरिक्त व्यापार आहे. चीन भारतापेक्षा अधिक तेल रशियाकडून खरेदी करतोय. त्यांच्यावर इतका दंड लादलेला नाही. मात्र, भारतावर दबाव टाकण्याचा ट्रम्प यांचा पर्यत्न असल्याचं देवळाणकर यांनी म्हटलं आहे.
टॅरिफ कधीपासून लागू होणार?
भारत रशियन फेडरेशन ऑईलची आयात करत असल्यानं अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादत आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आदेश लागू केल्यापासून 21 दिवसांनी लागू होणार आहे. म्हणजेच हा आदेश 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेला आदेश 21 दिवसांमध्ये लागू केला जाईल. म्हणजेच 27 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेला ज्या वस्तूंची निर्यात केली जाईल त्यावर लागू असेल. 27 ऑगस्टपूर्वी ज्या वस्तूंची अमेरिकेला निर्यात झाली असेल आणि ज्या वस्तू 17 सप्टेंबरपूर्वी अमेरिकेत पोहोचतीलत त्यांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं स्पष्टपणे संकेत दिले आहेत की रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तेल आयात करतील त्यांच्यावर या प्रकारची कारवाई केली जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2022 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणी आदेशाचा आधार घेतला आहे. ज्यामध्ये अमेरिकेनं रशियाच्या यूक्रेन विरोधातील युद्धामुळं रशियन तेल आयातीवर बंदी घातली होती. भारतानं या बंदीकडे दुर्लक्ष करुन रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवली आहे. ज्याचा त्यांना आर्थिक लाभ मिळत आहे. त्यामुळं भारतावर टॅरिफ लादलं आहे, असं आदेशात म्हटलंय.
या शुल्काशिवाय इतर सर्व टॅक्स, शुल्क आणि सेस देखील लागू राहतील. मात्र, काही विशेष वस्तूंना सूट दिलेली असू शकते.जी पुढील आदेशापर्यंत लागू असू शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या आदेशात म्हटल की जर कोणता देशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रशियाकडून तेल खरेदी करत असेल तर त्यांच्यावर टॅरिफ आणि प्रतिबंधात्मक पावलं टाकलं जातील. वाणिज्य मंत्री यासंदर्भातील चौकशी करतील आणि विदेशी मंत्री यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती पुढील कारवाईची शिफारस करतील. जर रशिया किंवा इतर प्रभावित देश अमेरिकेच्या विरोधात कारवाई करणार असतील तर ट्रम्प त्या आदेशाबदल करतील. रशियानं जर त्यांच्या भूमिकेत बदल केला तर टॅरिफ कमी करण्यासंदर्भातील विचार केला जाईल.
























