Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला, पहाटे भारतात पोहोचणार, नियोजित वेळेपूर्वी दौरा संपवला
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला आहे. ते पहाटे भारतात दाखल होतील.

Pahalgam Terrorist Attack :नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला आहे. मोदी बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान भारातत दाखल होतील. सौदी अरेबियातून ते आज रात्रीच भारताकडे रवाना होतील, अशी माहिती आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळं नियोजित वेळेपूर्वीच दौरा संपवण्यात आला आहे. आजच रात्री पंतप्रधान मोदी भारताकडे रवाना होतील. सौदी अरेबियाच्या सरकारने आयोजित केलेल्या डिनरलाही पंतप्रधान मोदी गेले नाहीत. बुधवारी पहाटे नरेंद्र मोदी पाच वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. यानंतर अमित शाह यांना श्रीनगरला पाठवण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेमागं जे गुन्हेगार आहेत त्यांच्यांवर कायद्याद्वारे कारवाई केली जाईल, असं देखील म्हटलं.
जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या आहेत तेव्हा नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची बैठक घेतली होती. नरेंद्र मोदी पुन्हा उद्या ही बैठक घेऊ शकतात. नरेंद्र मोदी यांच्यासोबत सौदी अरेबियात विदेश मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील आहेत.
नरेंद्र मोदी यांचं ट्विट :
I strongly condemn the terror attack in Pahalgam, Jammu and Kashmir. Condolences to those who have lost their loved ones. I pray that the injured recover at the earliest. All possible assistance is being provided to those affected.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2025
Those behind this heinous act will be brought…
नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. ज्या नागरिकांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करतो, असं मोदी म्हणाले. जे जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो, असं मोदी म्हणाले. या घटनेत जे पीडित आहेत त्यांना शक्य असणारी सर्व मदत केली जाईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पहलगाम दहशतवादी घटनेच्या मागं जे असतील त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्या अजेंडा कधीच यशस्वी होणार नाही. आमचा दहशतवादाविरोधातील लढा कमजोर होणार नाही, तो आणखी मजबूत होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
























