एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुरुष असल्याची बतावणी, महिलेशी लग्न, तरुणीला अटक
उत्तराखंडमधील नैनितालमध्ये राहणाऱ्या स्विटीने पुरुषाच्या वेशातील फोटो टाकून कृष्णा सेन या नावाने फेसबुकवर फेक प्रोफाईल तयार केली.
नैनिताल : पुरुष असल्याची बतावणी करुन श्रीमंत महिलांना जाळ्यात ओढत त्यांच्याशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीला अटक झाली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये 'पत्नी'ला हुंड्यासाठी छळणाऱ्या स्विटी सेनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तराखंडमधील नैनितालमध्ये राहणाऱ्या स्विटीने पुरुषाच्या वेशातील फोटो टाकून कृष्णा सेन या नावाने फेसबुकवर फेक प्रोफाईल तयार केली. या प्रोफाईलवरुन ती श्रीमंत महिलांशी संपर्क साधत असे. पुरुष असल्याचं भासवून तिने दोनवेळा लग्न केलं.
उत्तराखंडमधील काठघोडममध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीशी स्विटीची फेसबुकवरुन ओळख झाली. आपण पुरुष असल्याचं स्विटीने तिला भासवलं. त्याच वर्षी दोघी विवाहबंधनात अडकल्या. नैनितालमधील हलदवणी गावात त्या भाड्याच्या घरात राहायला लागल्या. काही दिवसातच स्विटीने तिला हुंड्यासाठी मारहाण करायला सुरुवात केली.
2016 मध्ये स्विटीने पुन्हा नैनितालमधल्याच 20 वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढलं. लग्न करुन आपल्या नव्या जोडीदारासह ती हरिद्वारमध्ये राहायला लागली. स्विटीने कुठल्याही तरुणीला आपल्या शरीराजवळ येऊ दिलं नाही.
स्विटीच्या पहिल्या पत्नीने काठघोडम पोलिसात ऑक्टोबर 2017 मध्ये तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं. हरिद्वारमध्ये फॅक्टरीसाठी स्विटीने आपल्या कुटुंबाकडून साडेआठ लाख रुपये घेतल्याचा आरोप पहिल्या पत्नीने केला.
पोलिसांनी हुंडा आणि घरगुती अत्याचारासाठी स्विटीला अटक केली. मात्र ती महिला असल्याची पोलिसांना कल्पना नव्हती. चौकशीत तिने आपण महिला असल्याचं सांगितलं. वैद्यकीय तपासणीत ती महिला असल्याचं समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement