एक्स्प्लोर

Prophet Muhammad : भाजपतून निलंबनानंतर नुपूर शर्मा यांच्यावर अटकेची टांगती तलवार, मुंबई पोलीस समन्स बजावणार

Nupur Sharma Statement : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या निलंबनानंतर आता मुंबई पोलीस त्यांना समन्स बजावणार आहे.

Controversial Remark On Prophet Mohammad : भाजपने (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं निलंबन केलं आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Mohammad) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपनं त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आता नुपूर शर्मा यांना समन्स (Summon) बजावण्यात येणार आहे. नुपूर शर्मा यांच्या विरोधात रझा अकादमीने एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला. 

AIMIM चे नेते ओवेसी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) आणि मुस्लिम समाजाशी संबंधित संघटनांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारीही सुरू झाली आहे. मुंबई पोलीस लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावणार आहेत. काही दिवसांपूर्वी रझा अकादमीने मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात नुपूर शर्माविरोधात गुन्हा दाखल केला होता.

धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप रझा अकादमीने तक्रारीत केला आहे. याशिवाय नुपूरयांच्या विरुद्ध ठाण्यातील मुंबा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डानेही या मुद्द्यावर नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर या मुद्द्यावरून AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान सर्व स्तरातून याला विरोध होत असतानाच साध्वी प्राची यांनी उघडपणे नूपूर यांचं समर्थन केलं आहे.

काय वाद आहे?

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील लोक संतप्त झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी म्हटलं होतं की, हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नुपूर शर्मा यांनी इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून धमक्या मिळत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget