एक्स्प्लोर

मुंबईकरांसाठी 'लोकल'च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक

मुंबईतील मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीची महत्त्वाची बैठक घेऊन मुंबईतील लोकल ट्रेन व गर्दीसंदर्भाने चर्चा केली.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील (Mumbai) आजच्या लोकल दुर्घटनेनं मुंबईकरांच्या जीवाचा प्रश्न नव्याने चिंतेत आला आहे. मुंबई, मुंबई लोकल (Local) आणि गर्दी यावर उपायसंदर्भात चर्चा घडत आहेत. मुंबईत दररोज 7 प्रवासी लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आलं आहे. त्यातच, आज मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेत 13 प्रवासी ट्रेनमधून पडले असून 4 जणांनी आपला जीव गमावल्याने राजकीय नेते व प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या दुर्घटनेवर प्रतक्रिया देताना, बंद दरवाजाच्या लोकलचा पर्याय सूचवला आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बंद दरवाजाच्या लोकल पर्याय नसून त्याने जीव गुदमरुन लोकं मरतील, असेही त्यांनी म्हटलं. त्याच, अनुषंगाने आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini vaishnav) यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील लोकल ट्रेनच्या अनुषंगाने चर्चा केली.  

मुंबईतील मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीची महत्त्वाची बैठक घेऊन मुंबईतील लोकल ट्रेन व गर्दीसंदर्भाने चर्चा केली. त्यामध्ये, मुंबईतील लोकल ट्रेनला दरवाजे असावेत की नसावे यावर प्रामुख्याने चर्चा झाली असून तीन पर्याय समोर आले आहेत. रेल्वेमंत्री आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या टीमसह बैठकीतून चर्चा व संवाद साधला. मुंबईत धावणाऱ्या नॉन एसी लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे असावेत की नसावेत याच अनुषंगाने बैठकी महत्त्वाची चर्चा झाली. त्यावर, येथील लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवल्यास ट्रेनमधील प्रवाशांचा दम गुदमरण्याची शक्यता आहे. कारण, ट्रेनचे दरवाजे बंद झाल्यानंतर व्हेंटीलेशनचा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे, हवा आतमध्ये येण्यास आणि बाहेर जाण्यास मोठा अडथळा निर्माण होईल, असा सूर बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून समोर आला. त्यानंतर, नॉन एसी लोकल ट्रेनसाठी नव्याने बनविण्यात येणाऱ्या ट्रेनच्या मॉडेलमध्ये अशी व्यवस्था करण्यात यावी, ज्याने व्हेंटीलेशनची समस्या येणार नाही, असा निर्णय बैठकीत झाला. त्यानुसार, मुंबई लोकल ट्रेनसाठी तीन नवीन डिझाईन बनविण्यात येणार आहेत. 

मुंबई लोकलसाठी तीन नवीन डिझाईन

1. लोकल ट्रेनच्या दरवाज्यामध्ये लूव्हर्स म्हणजे हवा खेळती राहणाऱ्या पट्ट्या बसवण्यात येणार, त्यामुळे व्हेंटीलेशन हवा खेळती राहू शकेल. 
2. रेल्वे डब्ब्याच्या छतावर व्हेंटीलेशन युनिट्स बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे, बाहेरुन ताजी हवा लोकलच्या डब्ब्यात येऊ शकेल. 
3. लोकल ट्रेनच्या कोचमध्ये वेस्टीब्यूल्स बसविण्यात येतील, ज्याने एका कोचमधून प्रवासी दुसऱ्या कोचमध्ये सहजपणे जाऊ शकेल. त्यातून ट्रेनमधील गर्दी स्वाभाविकपणे मोकळी होईल. 

रेल्वेमंत्र्यांसोबत आज झालेल्या बैठकीनंतर नव्याने येणारी ही मॉडेल ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार आहे. आवश्यक त्या निरीक्षण व चाचणी, प्रमाणानंतर जानेवारी 2026 पासून ही लोकल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत सुरू होईल. मुंबई उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठीच हे मॉडेल बनविण्यात येणार असून सध्या धावणाऱ्या 238 एसी ट्रेनशिवाय हे नवं मॉडेल मुंबईकरांसाठी असणार आहे. 

हेही वाचा

10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Railway Protest: मुंबईत मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Parth Pawar Land Row : पार्थ पवार जमीन व्यवहार: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, वडिलांचे हात वर
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local Masjid Bander : दोषींना वाचवण्यासाठी निष्पापांचा बळी Special Report
Mahayuti Rift: 'भाजप (BJP) मित्रपक्षांना गिळणारा राक्षस आहे', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Pune Land Scam : पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
40 एकरांच्या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाची तिघांविरोधात तक्रार, पार्थ पवारांचा भागीदार अडकला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
Embed widget