एक्स्प्लोर

Mulayam Singh Yadav Health : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक, आयसीयूमध्ये दाखल

Mulayam Singh Yadav Health : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Mulayam Singh Yadav Health : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी  त्यांना दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर नरेश त्रेहान हे  मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

मुलायमसिंह यादव  हे सध्या 82 वर्षांचे असून  गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत आहे. प्रकृती ठिक नसल्याने जूनमध्ये त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यार हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. परंतु, आज दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तपासणीत त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाल्याचे आढळून आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, मेदांताचे वरिष्ठ डॉक्टर नरेश त्रेहान स्वतः मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची देखरेख करत आहेत. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याची माहिती डॉ. नरेश त्रेहान यांनी दिली. 

मुलायम सिंह यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर अखिलेश यादव आणि डिंपल यादव मेदांता रुग्णालयात पोहोचले आहेत. यासोबतच शिवपाल सिंह यादवही मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे. मुलायम सिंह यांच्या ओरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन शिवपाल यादाव यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. "मुलायम सिंह यादव मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. माहिती मिळाळ्यानंतर  त्यांना भेटण्यासाठी आम्ही दिल्लीला आलो आहोत.  सर्वांनी नेताजींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन शिवपाल यादव यांनी केले आहे.  

मुलायम सिंह यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना  या पूर्वी देखील  अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही मुलायम सिंह यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

Congress President Election : काँग्रेसच्या तीन बड्या प्रवक्त्यांनी दिला राजीनामा, अध्यक्षपदाचे उमेदवार खरगे यांचा करणार प्रचार

ABP CVoter Survey : गुजरातमध्ये कुणाला मिळणार सत्ता? आपनं काँग्रेसला दिला धक्का, जाणून घ्या जनतेचा कौल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget