एक्स्प्लोर

Congress President Election : काँग्रेसच्या तीन बड्या प्रवक्त्यांनी दिला राजीनामा, अध्यक्षपदाचे उमेदवार खरगे यांचा करणार प्रचार

Congress President Election 2022: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. या निवडणुकीसाठी पक्ष तयारीला लागला आहे. यातच निवडणुकीचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

Congress President Election 2022: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. या निवडणुकीसाठी पक्ष तयारीला लागला आहे. यातच निवडणुकीचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खरगे यांच्यासह दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन उपस्थित होते. यादरम्यान काँग्रेसच्या या तीन बड्या प्रवक्त्यांनी राजीनामे दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आता हे तिन्ही प्रवक्ते काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रचार करताना दिसणार आहेत.

यावेळी बोलताना राजीनामा देणारे पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आम्ही पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून खरगे यांच्या प्रचारासाठी पुढे काम करणार आहोत. यानंतर आता काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा दिला आहे, असे म्हणता येईल.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, कठोर संघर्षानंतर मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी कुठेही गेलो तरी तिथे पूर्णवेळ काम करण्याची माझी सवय आहे. पक्षातील बदलांबाबत काँग्रेस खासदार यांनी खरगे याना लक्ष्य केलं होत. यावर बोलता ते म्हणाले आहेत की, त्यांच्या मनात विचार असू शकतात. याबाबत 9,300 प्रतिनिधी निर्णय घेतील. ही घरची बाब आहे. मी एकटा करणार नाही, समितीतील सर्वजण मिळून निर्णय घेतील.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, गांधी परिवाराने या देशासाठी बलिदान दिले आहे. दहा वर्षे काँग्रेस सरकारमध्ये असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला नाही, की त्यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न केला नाही. आजही राहुल गांधी उन्हात भारत जोडो यात्रा करत आहेत. त्यांच्याशी आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी मी नक्कीच चर्चा करेन. 

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या धोरणानुसार राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. आता या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चा रंगली आहे.  राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या तीन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह किंवा प्रमोद तिवारी यांच्यापैकी कोणालाही राज्यसभेत विरोधी पक्षनेते केले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

ABP CVoter Survey : गुजरातमध्ये कुणाला मिळणार सत्ता? आपनं काँग्रेसला दिला धक्का, जाणून घ्या जनतेचा कौल

ABP C-Voter Survey: हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पुनरागमन करणार का? जाणून घ्या लोकांचा कल

 

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget