एक्स्प्लोर
अंबानींच्या मुलाच्या लग्नाची चर्चा, कोण आहे होणारी सून?
आकाशचं लग्न ज्या मुलीशी होणार आहे, ती भारतातील टॉप -5 हिरे व्यापाऱ्यांपैकी एक असलेले रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे.
मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी लवकरच सासरेबुवा होणार आहेत. त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी येत्या वर्षभरात बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे.
आकाशचं लग्न ज्या मुलीशी होणार आहे, ती भारतातील टॉप -5 हिरे व्यापाऱ्यांपैकी एक असलेले रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. श्लोका मेहता असं तिचं नाव आहे.
श्लोका आणि आकाश हे एकाच शाळेत म्हणजेच धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकले आहेत.
एकीकडे श्लोका आणि आकाशच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे, मात्र दोन्ही कुटुंबानी त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
येत्या काही दिवसात श्लोका आणि आकाशच्या साखरपुड्याची घोषणा होऊ शकते. इतकंच नाही तर या वर्षाच्या शेवटी डिसेंबरपर्यंत दोघे लग्नबंधनात बांधले जातील, असंही सांगण्यात येत आहे. भारतातच हे शाही लग्न होऊ शकतं.
आकाश हा मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आहे. अंबानी आणि मेहता कुटुंबाचे मैत्रीचे संबंध आहेत.
कोण आहे श्लोका मेहता?
श्लोका ही रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. श्लोकाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेतील प्रिंस्टन युनिव्हर्सिटीत अँथ्रोपोलॉजी अर्थात मानववंशशास्त्राचं शिक्षण घेतलं.
त्यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून लॉची पदवी घेतली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोका आपल्या वडिलांच्या हिऱ्याच्या कंपनीत संचालक बनली. याशिवाय ती ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची संस्थापक आहे जी एनजीओंना मदत करते.
आकाशचंही यूएसमध्ये शिक्षण
मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाशनेही शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुढील शिक्षणासाठी अमेरिका गाठली होती. तिथल्या प्रतिष्ठित विद्यापीठाची पदवी प्राप्त केली.
आकाश अंबानी रिलायन्स जिओ टेलिकॉमचे चीफ ऑफ स्ट्रॅटेजी अर्थात धोरण प्रमुख आहेत. या कंपनीची संपत्ती सुमारे 2 लाख कोटी इतकी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement