Mahashivratri 2023 : मुकेश अंबानींनी सोमनाथ महादेवाचा केला रुद्राभिषेक, 1.51 कोटींची दिली देणगी
Mukesh Ambani At Somnath Temple: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. स्टायलिश असण्यासोबतच मुकेश अंबानी यांचे कुटुंबही खूप धार्मिक देखील आहे.
Mukesh Ambani At Somnath Temple: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. स्टायलिश असण्यासोबतच मुकेश अंबानी यांचे कुटुंबही खूप धार्मिक देखील आहे. महत्त्वाच्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करतात आणि देणग्या देतात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबियांना अनेकवेळा पाहिलं गेलं आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरात (gujarat ) येथील सोमनाथ मंदिराला (samantha temple) भेट दिली आणि मुलगा आकाश अंबानीसह (Akash Ambani) सोमनाथ महादेवाचा रुद्राभिषेकही केला. मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाच्या वतीने सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1.51 कोटी रुपयेही दान करण्यात आले आहेत.
Mukesh Ambani At Somnath Temple: महाशिवरात्रीला मुकेश अंबानी सोमनाथ मंदिरात पोहोचले
सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि आकाश अंबानी (Akash Ambani) यांचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सचिव योगेंद्र देसाई यांनी स्वागत केले. दोघांचेही मंदिर ट्रस्टतर्फे शाल व चंदनाचे लेप देऊन स्वागत करण्यात आले. मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी सोमनाथ महादेवाची (samantha temple) विधिवत पूजा केली आणि त्यांनी भोलेनाथाचा रुद्राभिषेकही केला. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) फिकट गुलाबी तर आकाश अंबानी (Akash Ambani) फिकट निळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहेत. फोटो पाहून सर्वजण अंबानी कुटुंबाचे कौतुक करताना दिसत आहेत.
On #Mahashivratri, Mukesh Ambani, Chairman and Managing Director of Reliance Industries Limited, and his son, Akash Ambani, Chairman of Reliance Jio, visited Somnath Mahadev in Gujarat. Mukesh Ambani donated Rs 1.51 crore to the Somnath temple trust. pic.twitter.com/Bl5ny6RrhH
— ANI (@ANI) February 18, 2023
Mukesh Ambani At Somnath Temple: सोमनाथ मंदिर हे देशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक
गुजरातचे प्रसिद्ध सोमनाथ मंदिर (samantha temple) हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. सोमनाथ मंदिराबाबत (samantha temple) हिंदूंची धार्मिक श्रद्धा आहे आणि भोलेनाथाच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वेरावळ या प्राचीन बंदराजवळ गुजरातमधील गीर जिल्ह्यात सोमनाथ मंदिर (samantha temple) आहे.
इतर महत्वाच्या बातमी:
अमित शाहांचा ठाकरेंना टोला; शिंदेंना शिवसेना, धनुष्यबाण मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....