एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माऊंट अबू पर्वतरांगांमधील आग चार दिवसांनी विझली
जोधपूर : राजस्थानमधील माऊंट अबूच्या पर्वतरांगात लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. तब्बल चार दिवसानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
हवाई दलाने जवळपासच्या तलावातून बांम्बी बकेट्सच्या सहाय्याने पाणी आणलं आणि चार दिवसानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या चार दिवसात आगीमुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे.
सिरोही जिल्ह्यात माऊंट अबूच्या अरावली पॉईंटमध्ये गुरुवारी सकाळी आग लागली होती. त्यानंतर आग 20 किमीपर्यंत पसरली. वनविभाग आणि जिल्हा प्रशासन सातत्याने आगीवर नियंत्रण मिवण्याचे प्रयत्न करत होतं. मात्र त्यांना आग आटोक्यात आणण्यात अपयश आल्याने सीआरपीएससह हवाई दलाकडून मदत घेण्यात आली.
यानंतर हवाई दलाच्या 17 हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. सीआरपीएफचे 150, पोलिसांचे 200 आणि सैन्याच्या जवानांसह स्थानिक प्रशासनाचे मिळून 600 जवान बचावकार्य करत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement