महामार्गांच्या गुणवत्तापूर्ण निरीक्षणासाठी Mobile Inspection Vans; चार राज्यांत पायलट बेसिसवर काम सुरू
गुजरात, राजस्थान, ओडिशा आणि कर्नाटकमध्ये हा प्रोजेक्ट सुरू होणार असून भविष्यात संपूर्ण देशभर लागू करण्यात येणार आहे.
मुंबई: देशातील महामार्गांच्या गुणवत्तापूर्ण निरीक्षणासाठी आता मोबाईल इन्स्पेक्शन व्हॅनचा (Mobile Inspection Vans) वापर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सुरुवातीला गुजरात, राजस्थान, ओडिशा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये पायलट बेसिसवर काम सुरू करण्यात येणार असून नंतर याची अंमलबजावणी संपूर्ण देशभर करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या संबंधी एक निवदेन प्रसिद्ध केलं आहे.
.@MORTHIndia engages services of Mobile Inspection Vans for quality inspection of NHs, through non-destructive testing, in 4 states, on pilot basis
— PIB India (@PIB_India) August 3, 2022
This is part of Ministry’s commitment towards constructing National Highways with global quality standardshttps://t.co/PCJwQycerF
आपल्या देशात जागतिक स्तराच्या गुणवत्तापूर्ण महामार्गांच्या जाळ्याची उभारणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मोबाईल इन्स्पेक्शन व्हॅनचा वापर केल्याने महामार्गांच्या रस्तांची गुणवत्ता तसेच क्वालिटी कंट्रोल टिकून राहिल. तसेच या रस्त्यांच्या गुणवत्तेसंबंधी काही मुद्दे किंवा समस्या असतील तर त्याच्यावरही काम करणं सोप होईल.
येत्या तीन महिन्यामध्ये या चार राज्यांतील महामार्गाच्या प्रत्येकी 2000 किमी रस्त्यांचे परीक्षण केलं जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या प्रोजेक्ट्सचे परीक्षण करण्यात येणार आहे. गुजरात राज्याने या संबंधीच्या करारपत्रावर आज स्वाक्षरी केली आहे. राजस्थान, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांकडूनही असे करारपत्र करुन घेण्यात येणार आहेत. या चार राज्यांनंतर देशातील इतर राज्यांमध्येही हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nitin Gadkari : नितीन गडकरींची मोठी घोषणा, शहरातील टोल होणार रद्द, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
- महाराष्ट्रातील पाच पैकी दोन ज्योतिर्लिंग राष्ट्रीय महामार्गाने जोडणार, राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; नितीन गडकरींची घोषणा
- Nandurbar Road : नितीन गडकरींनी लोकार्पण केलेल्या सेंधवा-विसरवाडी राष्ट्रीय महामार्गाला अनेक ठिकाणी तडे, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह