Morning Headlines 24th June : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..
वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गहू आणि तांदळाचे ई-लिलाव करणार, FCI च्या अध्यक्षांची माहिती
गहू (wheat) आणि तांदळाच्या (Rice) किरकोळ बाजारातील वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं भारतीय अन्न महामंडळाला (FCI) ई-लिलाव करण्याचे निर्देश दिले आहेत. लिलावात सहभागी होण्यासाठी व्हीट स्टॉक मॉनिटरिंग सिस्टम पोर्टलवर (गहू साठा निरीक्षण यंत्रणा) नोंदणी अनिवार्य आहे. (वाचा सविस्तर)
Congress: आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसची तयारी, काँग्रेस पहिल्यांदाच 400 पेक्षा कमी जागा लढणार?
पाटण्यात शुक्रवारी पार पडलेली बैठक यशस्वी करायची असेल, तर काँग्रेसला (Congress) मोठा त्याग करावा लागणार आहे. हे जवळपास निश्चित आहे. कारण, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त प्रभाव स्थानिक पक्षांचा आहे. आणि स्थानिक पक्षांच्या प्रभावामुळे काँग्रेसला गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलाच फटका बसलाय. आता आगामी निवडणुकांमध्ये जर हेच नुकसान टाळायचं असेल तर काँग्रेसला जागांमध्ये मोठी तडजोड करावी लागणार हे स्पष्ट आहे. (वाचा सविस्तर)
माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी करणार लिंग परिवर्तन, शस्त्रक्रियेनंतर नावही बदलणार; म्हणाली, ''मी या लढाईसाठी तयार''
पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharya) यांच्या मुलीने लिंग परिवर्तन (Gender Change) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आपण या लढाईसाठी तयार असल्याचं तिने सांगितलं आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य (Suchetna Bhattacharya) लिंगबदल शस्त्रक्रिया (Gender Change Surgery) करणार आहे. (वाचा सविस्तर)
कमला हॅरिस यांचे काम जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी, पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 21 जूनपासून त्यांचा अमेरिकेचा दौरा सुरु झाला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या या अमेरिका दऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (Antony Blinken) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लंचचे आयोजन केले होते. (वाचा सविस्तर)
उत्तर भारतात पावसाची हजेरी; मध्य प्रदेशात बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम, आज मुसळधार पावसाचा इशारा
देशातील वातावरणात सतत बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर भारतातील काही राज्यात पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy cyclone) मध्य प्रदेशमध्ये चांगलाच प्रभाव जाणवत आहे. मध्य प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. (वाचा सविस्तर)
मान्सून लांबल्याने महागाई वाढण्याची शक्यता, अन्नधान्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न
यंदाचा मान्सून (Monsoon) लांबल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देशात मान्सून दाखल झाला, खरा पण त्यानंतर मात्र तो दडी मारून बसला. शुक्रवारपासून देशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पण पाऊस लांबल्याने याचा परिणाम अन्नधान्यांच्या किमतीवर झाला आहे. (वाचा सविस्तर)
24th June In History: नटसम्राट नानासाहेब फाटक, 'पाणीवाली बाई' मृणालताई गोरे यांचा जन्म; आज इतिहासात....
आजचा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. मराठी रंगभूमीचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या, महिलांना त्यांच्या प्रश्नावर संघटीत करणाऱ्या मृणाल गोरे यांचाही जन्मदिन आहे. (वाचा सविस्तर)
मेष, सिंह, मकरसह 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांना आज नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आजचा शनिवार मेष ते मीन राशींसाठी कसा राहील? (वाचा सविस्तर)