एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Congress: आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसची तयारी, काँग्रेस पहिल्यांदाच 400 पेक्षा कमी जागा लढणार?

Patna Opposition Meeting: विरोधकांच्या बैठकीत लोकसभेच्या 450 जागांवर  एक उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली आहे. जर तोच निर्णय झाला तर काँग्रेसलाच सर्वात मोठा धक्का बसेल

Patna Opposition Meeting: पाटण्यात शुक्रवारी पार पडलेली बैठक यशस्वी करायची असेल, तर काँग्रेसला (Congress) मोठा त्याग करावा लागणार आहे. हे जवळपास निश्चित आहे. कारण, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त प्रभाव स्थानिक पक्षांचा आहे. आणि स्थानिक पक्षांच्या प्रभावामुळे काँग्रेसला गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलाच फटका बसलाय. आता आगामी निवडणुकांमध्ये जर हेच नुकसान टाळायचं असेल तर काँग्रेसला जागांमध्ये मोठी तडजोड करावी लागणार हे स्पष्ट आहे... असं असलं तरी अनेक राज्यांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना होणार आहे.

राहुल गांधींचा विश्वास पूर्ण करायचा असेल तर पाटण्यात जी विरोधकांची एकजूट दिसली. 2024  पर्यंत कायम राहिली पाहिजे. मात्र यामध्ये एक अडचण आहे. कारण  बैठकीत लोकसभेच्या 450 जागांवर  एक उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली आहे. जर तोच निर्णय झाला तर काँग्रेसलाच सर्वात मोठा धक्का बसेल. कारण काँग्रेसनं आजपर्यंत एकदाही 400 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवली नाही. 

 काँग्रेस 400 पेक्षा कमी जागा लढणार?

वर्ष      

    लढलेल्या जागा    

     जिंकलेल्या जागा

2004 400 145
2009 440 206
2014 464 44
2019 421 52

आता काँग्रेसनं जर विरोधकांच्या मुद्द्यांनुसार ही बाब मान्य केली तर काँग्रेसला 400 जागा मिळणार नाहीत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या निकालाची थोडी फोड केली. काँग्रेसनं लढवलेल्या 421 जांगापैकी 209 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. त्यापैकी 175 ठिकाणी भाजपला विजय मिळाला होता.

आजघडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढती कुठे कुठे आहेत..

राज्य         लोकसभेच्या जागा

मध्य प्रदेश         28
कर्नाटक            20
गुजरात              26
राजस्थान            25
छत्तीसगड           11
आसाम               14
हरियाणा             11
हिमाचल              04
उत्तराखंड             05
गोवा                    02
अरुणाचल प्रदेश     02
मणिपूर                 02

त्याचबरोबर चंदीगड, अंदमान निकोबारच्या प्रत्येकी दोन आणि लडाखच्या एका जागेवर काँग्रेस-भाजप थेट लढत असेल. त्याशिवाय पंजाब, महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमधील 38 जागांवरही काँग्रेसचीच थेट लढत भाजपशी होणार आहे त्यामुळे काँग्रेसला एकास एक उमेदवार हा प्रस्ताव मान्य होईल का? कारण, जर हा प्रस्ताव मान्य झाला. तर काँग्रेसच्या वाट्याला 220 ते 240 जागाच येतील..

कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस हा प्रस्ताव मान्य करणार का?

कर्नाटकातील विजयानंतर पक्षानं आपण 350 जागांपेक्षा कमी जागा लढवणार नाही असा दावा केला होता. अशा परिस्थिती मित्रपक्षांना फक्त 193 जागा उरतील त्या त्यांना मान्य असतील का? शिवाय काँग्रेसनं मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही तयारी सुरु केलीय.तिथं जर काँग्रेसला यश आलं. तर मात्र या फॉर्म्युल्याचं काय होणार..याबाबत आज तरी स्पष्टता नाही.

आजची बैठक ही फक्त औपचारिकताच मानावी लागेल. लोकसभेला एक वर्ष बाकी आहे.त्यात जर मोदींना आव्हान द्यायचं असेल तर मात्र काँग्रेसला मोठा त्याग करावा लागणार आहे.हे जवळपास स्पष्ट आहे..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 28 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Embed widget