एक्स्प्लोर

Morning Headlines 18 July: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Maharashtra NCP Crisis: अजित पवार अन् आमदारांकडून थोरल्या पवारांची सातत्यानं मनधरणी; नेमकी कसली चिंता सतावतेय?

Maharashtra NCP Political Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) थोरल्या पवारांची साथ सोडली आणि राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politcs) समीकरणं पुरती बदलून गेलीत. अशातच अजित पवारांनी भाजपची (BJP) कास धरत उपमुख्यमंत्रीपदाची, तर त्यांच्यासोबतच्या इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट अशा दोन गटांत विभागली गेली. वाचा सविस्तर 

Meeting : विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस, शरद पवार राहणार उपस्थित; तर दिल्लीत NDA ची बैठक

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपविरोधात एकत्र लढण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा इथं झाल्यानंतर आता बंगळुरुमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधकांनी बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. तर दुसरीकडं भाजपकडून दिल्लीत एनडीएच्या (NDA) बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष सुद्धा उपस्थित राहणार आहेत. वाचा सविस्तर 

विरोधी पक्षांना जोडण्याच्या सोनिया गांधींच्या प्रयत्नांना बळ मिळेल? सी व्होटर सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?

ABP C Voter Survey On Opposition Meeting: भाजप (BJP) विरोधकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. भाजप विरोधकांची आज दुसरी बैठक बंगळुरूमध्ये (Bengaluru) होतेय. बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलमधील या बैठकीत तब्बल 26 विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. 11 वाजता बैठक सुरू होईल आणि अंदाजे 4 वाजता संपेल. वाचा सविस्तर 

Delhi Floods News: चार दिवसानंतर यमुनेची पाणी पातळी वाढली, पुन्हा ओलांडला धोक्याचा टप्पा; पुरामुळं दिल्लीत वाढला आजारांचा धोका 

Delhi Flood : सध्या उत्तर भारतात (North India) जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पुरामुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालंआहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळं दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत (Yamuna River water level) पुन्हा वाढ झाली आहे. नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, पुरामुळं दिल्लीत वाढला आजारांचा धोका वाढला आहे. वाचा सविस्तर 

Oommen Chandy Death: केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचं निधन

Oommen Chandy Passes Away: केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी (Oommen Chandy) यांचं मंगळवारी (18 जुलै) निधन झालं. ते काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे 79 वर्षांचे होते. वाचा सविस्तर 

International Nelson Mandela Day 2023 : आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन नेमका का साजरा केला जातो? वाचा या दिनाचं महत्व

International Nelson Mandela Day 2023 : संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आजचा हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन (International Nelson Mandela Day) म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीसाठी संघर्ष आणि जगभरातील शांतता वाढविण्यात नेल्सन मंडेला यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येतो. 18 जुलै 2009 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथम मंडेला दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने 10 नोव्हेंबर 2009 रोजी एक ठराव संमत करून 18 जुलैला “आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन” म्हणून घोषित केले. वाचा सविस्तर 

18th July In History: लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे निधन, वर्णभेदविरोधी लढ्याचे नेते नेल्सन मंडेला यांचा जन्म; आज इतिहासात

18th July In History: आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. मानवाच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत आपले मोलाचे योगदान देणाऱ्या नेत्यांचे स्मरण करणारा आजचा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी चळवळीचे नेते नेल्सन मंडेला यांचा जन्मदिन आहे. तर, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, श्रमिक-दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today : मेष, सिंह, तूळ आणि धनु राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 18 July 2023 : आज वार मंगळवार दिनांक 18 जुलै 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष, सिंह, तूळ आणि धनु राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :22 ऑगस्ट 2024 : ABP MajhaManoj jarange Jalna: मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालय काही  दिवसांत तयार होणारBadlapur Case : आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा  खळबळजनक आरोप; बदलापूर अत्याचार प्रकरणात ट्विस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
OTT Release This Week : 'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
चल तुला चॉकलेट देतो, चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेलं, अन्...; शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार
चल तुला चॉकलेट देतो, चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेलं, अन्...; शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार
मुंबईच्या गणेशोत्सवात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा 'ग्रीन कॉरीडोर'; नेमकी संकल्पना काय?
मुंबईच्या गणेशोत्सवात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा 'ग्रीन कॉरीडोर'; नेमकी संकल्पना काय?
Embed widget